27 C
Mumbai
Thursday, January 2, 2025
घरदेश दुनियासरसंघचालकांनी केले अखंड भारताचे सूतोवाच

सरसंघचालकांनी केले अखंड भारताचे सूतोवाच

Google News Follow

Related

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड भारताच्या संदर्भात सूतोवाच केले आहे. नागपूर येथे संघाच्या विजया दशमी उत्सवात ते बोलत होते. ‘हरवलेली अखंडता पुन्हा मिळवण्यासाठी नव्या पिढीला इतिहास अभ्यासावा लागेल’ असे सरसंघचालकांनी म्हटले आहे.

शुक्रवार, १५ ऑकटोबर रोजी नागगपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजया दशमी उत्सव आयोजित करण्यात आला होता. कोरोना महामारीच्या तब्बल १.५ वर्षांच्या कालखंडानंतर संघाचा उत्सव प्रत्यक्ष स्वरूपात पार पडला. हिंदू परंपरेनुसार शस्त्र पूजन करून या उत्सवाला सुरुवात झाली. तर त्यांनतर संघाच्या पद्धतीप्रमाणे स्वयंसेवकांच्या कवायती, नियुद्ध प्रात्यक्षिके, घोष वादन, वैयक्तिक गीत या सर्व गोष्टी पार पडल्या.

यानंतर सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी आपले संबोधन सुरु केले. यावेळी सरसंघचालकांनी समाजासमोरच्या आणि देशासमोरच्या अनेक आव्हानांवर भाष्य केले. सुरुवातीलाच त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उल्लेख केला. १९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. ‘स्व’ च्या तंत्राने देश चालवण्यासाठी सर्व संघर्ष करत होते. स्वातंत्र्य म्हणजे काय याच्या प्रत्येकाच्या व्याख्या भिन्न असल्या तरीही स्वातंत्र्य चळवळीत सर्वांचा भाव एकाच होता असे सरसंघचालक यांनी म्हटले. तर या सर्व क्रांतीकारांमध्ये संवाद नसला तरीही त्यांचे भाव समान होते.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील सरकारी बंद विरोधात उच्च न्यायलायत याचिका

… म्हणून मुंबई पोलीस समीर वानखेडेंना समन्स पाठवणार

नवाब मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द होणार?

आव्हाडांना हाकला!

स्वातंत्र्यप्राप्ती नंतर कालांतराने ‘स्व’ ची कल्पना अस्पष्ट झाली. ‘स्व’ ला विसरलो म्हणून सृजनांनाही विसरलो. वेगवेगळे भेद आणि संघर्ष वाढले. जाती, भाषा, पंथ यांचे भेद निर्माण झाले आणि ‘स्व’ चे विस्मरण झाले. हे भेद मिटवावे लागतील असे सरसंघचालक म्हणाले.

आपण स्वतंत्र झालो तेव्हा आनंदासोबत एक भळभळती जखमही मिळाली जी अद्याप भरलेली नाही असे सरसंघचालक म्हणाले. तर हरवलेली अखंडता पुन्हा मिळवण्यासाठी नव्या पिढीला इतिहास अभ्यासावा लागेल. कारण आजची नवी पिढी तेव्हा जन्मलेली नव्हती असे त्यांनी सांगितले.

नागपूर येथे पार पडलेल्या संघाच्या या विजया दशमी उत्सवाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण गणवेशात उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा