सोनोवाल यांनी हिंमताना दिल्या शुभेच्छा

सोनोवाल यांनी हिंमताना दिल्या शुभेच्छा

आसामचे होणारे नवे मुख्यमंत्री हिमांता बिस्व सरमा यांना मावळते मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. रविवारी हिमांता यांची आसाम विधानसभेतील भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे सरमा यांच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झाले. पुढील दोन दिवसांत हिमांता बिस्व सरमा आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

रविवार, ९ मे रोजी सकाळी ११ वाजता दिसपूर येथे भाजपाच्या विधीमंडळ दलाची बैठक पार पडली. या बैठकीला बी.एल संतोष, बैजयंत जय पांडा आणि अजय जम्वाल आदी नेतेही उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांनी हिमांता बिस्व सरमा यांच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव बैठकीत तात्काळ मंजूर करण्यात आला. त्यामुळे सरमा यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झाले आहे. सरबानंद यांनी आधीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत.

हे ही वाचा:

नरी कॉन्ट्रॅक्टर यांनाही लसीकरणाच्या अव्यवस्थेचा बसला फटका

युरेनियम चोरी प्रकरणात एनआयएची एन्ट्री

लसीकरण हा एकच उपाय,टाटा ग्रुपचं मत

हिमांता बिस्व सरमा आसामचे नवे मुख्यमंत्री

सोनोवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून हिमांता यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “आसाम भाजपाचे विधिमंडळातील नेते म्हणून हिमांता बिस्व सरमा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण टीम आसाम म्हणून एकत्र सुरु केलेली विकासयात्रा तुम्ही अशीच पुढे सुरु ठेवाल असा मला विश्वास आहे.” असे सोनोवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version