१०० कोटी वसुली प्रकरणात संतोष जगताप अटकेत

१०० कोटी वसुली प्रकरणात संतोष जगताप अटकेत

महाराष्ट्रात गाजलेल्या शंभर कोटी वसुली प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड घडली असून या प्रकरणातील पहिली अटक सीबीआयने केली आहे. संतोष जगताप नामक इसमाला सीबीआयने या प्रकरणात बेड्या ठोकल्या आहेत. जगताप हा मध्यस्थ म्हणून काम करत असून पैशाच्या देवाण घेवाणीमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता.

संतोष जगताप हा मध्यस्थ म्हणून काम करत असून अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये तो महत्त्वाची भूमिका पार पाडायचा. यासाठी अधिकाऱ्यांमार्फत मिळणाऱ्या पैशाची देवाण घेवाण त्याच्यामार्फत केली जात असे. सीबीआयच्या तपासात संतोष जगताप याचे नाव समोर आल्यावर ठाण्यातील त्याच्या निवासस्थानी सीबीआय अधिकाऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात छापेमारी केली होती. यावेळी तब्बल नऊ लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली होती.

जगताप याने आपल्याला तपासात सहकार्य करावे असे सीबीआय मार्फत वारंवार सांगण्यात येत होते. पण तसे घडताना दिसले नाही. तो चौकशीलाही हजर राहत नव्हता. त्यामुळे गेल्या महिन्यात कोर्टाने जगताप विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानुसार पोलीस संतोष जगताप याचा शोध घेत होते. आज म्हणजेच रविवार ३१ ऑक्टोबर रोजी जगताप याला ठाणे येथे सीबीआय अधिकाऱ्यांनी अटक केली. अटक केल्यावर त्याला लगेच न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला ४ नोव्हेंबर पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे ही वाचा:

खासदार सुप्रिया सुळे आर्यन खानला झालेल्या अटकेने व्यथित

परमबीर गेले बेल्जियमला?

युगायुगांत एकच व्यक्ती ‘सरदार’ होऊ शकते…

‘दाऊदसोबत विमानात कोण बसले होते, हे शरद पवारांनी सांगावे’

शंभर कोटी वसुली प्रकरणातली ही एक महत्त्वाची अटक मानली जात आहे. त्यामुळे या अटकेमुळे आता या प्रकरणाचा पुढचा तपास कोणत्या दिशेने जाणार हे बघणे महत्त्वाचे ठरले आहे.

Exit mobile version