संजय उपाध्याय असणार भाजपाचे राज्यसभा उमेदवार

संजय उपाध्याय असणार भाजपाचे राज्यसभा उमेदवार

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी संजय उपाध्याय हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असणार आहेत. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी या संबंधीची अधिकृत घोषणा केली आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी आता निवडणूक होऊ घातली आहे.

निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यासाठी भाजपातर्फे संजय उपाध्याय यांना उमेदवारी घोषित केली आहे. सोमवार, २० सप्टेंबर रोजी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी उपाध्याय यांच्या नावाची घोषणा केली आहे.

हे ही वाचा:

गडहिंग्लजसाखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी १०० ​कोटींचा घोटाळा केला

रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये १९ बंगल्यांचा घोटाळा

जॅवलिन एक प्रेमकथा…नीरज चोप्राच्या जाहिरातीचा धमाका

पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर महिला आयएएस अधिकाऱ्याने काय केला होता आरोप?

संजय उपाध्याय हे भाजपाचे मुंबई महामंत्री आहेत. गेली अनेक वर्ष त्यांनी भाजपाच्या अनेक संघटनात्मक जबाबदारी पार पाडल्या आहेत. भाजपाचा जमिनीवरचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. अद्याप या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून कोणालाही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण असणार या संदर्भात चर्चा रंगलेल्या दिसत आहेत. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नीला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version