“संजय राऊत यांच्यावर होत असलेल्या कारवाईने आनंद”

“संजय राऊत यांच्यावर होत असलेल्या कारवाईने आनंद”

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून आज सकाळी ईडीचे पथक संजय राऊतांच्या घरी दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणात सध्या संजय राऊतांची त्यांच्या भांडुपमधल्या ‘मैत्री’ या बंगल्यात चौकशी सुरू आहे. यावर एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले आमदार संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“संजय राऊत यांच्या भोंग्यामुळे शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे सामान्य शिवसैनिकासह ४० आमदार आणि १२ खासदारही आनंदी असतील,” असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे. “संजय राऊत यांच्याकडे प्रखर वाणी आहे. त्यांचं लेखणीवर प्रभुत्व आहे, त्याआधारे त्यांनी स्वतःची सुटका करून घ्यावी,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आमचं पोस्टमार्टेम करायला निघालेल्या संजय राऊत यांचं पोस्टमार्टेम तपास यंत्रणांनी सुरू केले असल्याचे शिरसाट यांनी म्हटले.

“संजय राऊत हे अत्यंत हुशार नेते आहेत त्यांना ईडीची भीती वाटत नाही,” असा खोचक टोला शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांना लगावला आहे. ईडीची जेव्हा एवढी मोठी धाड पडते तेव्हा अटक होण्याची शक्यता जास्त असते. संजय राऊत हे फक्त प्रवक्ते आहेत, लीडर नाहीत,” अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.

हे ही वाचा:

“आमची सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब होत असताना पाहून समाधान वाटतंय”

संजय राऊत ईडीचणीत

तिस्ता सेटलवाड आणि श्रीकुमार यांना दिलासा नाहीच

यंदा राखी खरेदीसाठी बहिणींना मोजावे लागणार ज्यादा पैसे

संजय राऊत यांनी बाळासाहेबांची शपथ घेऊ नये. एवढे मोठे नाहीत ते, बाळासाहेबांची शपथ घेण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे आम्ही या शिवसेनेत ४० वर्ष आहोत. तुम्ही शिवसेना सोडू नका एक दिवस हीच शिवसेनेतून तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल तेव्हा त्यांना त्यांची जागा कळेल,” असे संजय शिरसाट म्हणाले.

Exit mobile version