उद्धव ठाकरे याना धक्का देत नाशिक आणि परभणीतील शिवसेना कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी झाली आहेत. औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी शिंदे गटातील इनकमिंग वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. येत्या काही दिवसांतच शिवसेना पूर्णपणे रिकामी होईल असा टोला लागवतांच शिवसेनेचे उर्वरित आमदार पुढील ८-१० दिवसांत शिंदे गटात सहभागी होतील, असा विश्वास शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
शिवसेनेत सकाळी सुरू असलेल्या भोंग्यामुळे ही वेळ येईल. विशेषतः भविष्यात निवडणूक लढवायची किंवा नाही असा प्रश्न स्वतः उद्धव ठाकरेंपुढे उभा राहील. उद्धव ठाकरे यांना मिसगाईड करणारे लोक आहेत. त्यामुळे शिवसेना संपत आहे. आजही तेच सुरू आहे. कोण बोलत आहे? काय बोलत आहे? त्यांना पक्षाशी काहीच देणेघेणे नाही. या लोकांनी कधी थेट जनतेत जाऊन काम केले नाही. शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे. पण उद्धव ठाकरे शांत का आहेत हे कळत नाही, असा सवालही शिरसाट यांनी केला.
हे ही वाचा:
बावनकुळेंविषयी केलेले ट्विट आव्हाड यांनी केले डीलिट; औरंगजेबाची कबर असल्याचा केला होता दावा
पोस्टरवरच्या अंगप्रदर्शनाला आक्षेप घेणारा महिला आयोग उर्फीबाबत गप्प?
अयोध्येत उभे राहणार ‘महाराष्ट्र भवन’
काँग्रेसला भगव्या रंगाचा इतका तिरस्कार का?
शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही आत व्यक्त केलं. मंत्रिमंडळ विस्तार व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. मी याविषयी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांनी काही तांत्रिक अडचणींमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं सांगितले. या अडचणी १५ तारखेपर्यंत दूर होतील. त्यानंतर २०-२२तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल सरकारमधील अनेक राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री भरायची आहेत. काही गोष्टींमुळे विस्तार रखडलाय. विस्तार होणार नाही असे नाही, तो करावाच लागणार आहे, असा दावाही शिरसाट यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.