23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणराऊत यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणुकही लढवावी

राऊत यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणुकही लढवावी

संजय शिरसाट यांचा जोरदार हल्लाबोल

Google News Follow

Related

संजय राऊत यांनी जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक लढवण्यासंबंधी वक्तव्य केलं होतं. राऊत यांनी जम्मू-काश्मीरच काय तर अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणुकही लढवावी.देशात सगळीकडे डिपॉझिट जप्त झालेलं असताना त्यांच्यात एवढा आत्मविश्वास कुठून येतो, अशा शेलक्या शब्दात शिंदे गटाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी राऊत यांना डिवचलं आहे.

शिंदे गटाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. येत्या काळात शिवसेना जम्मू काश्मीरमधून निवडणूक लढवेल, येथील काश्मीरी पंडितांच्या समस्या सोडवेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी नुकतंच केलं होते त्यावरून संजय शिरसाट यांनी त्यांची खिल्ली उडवली.

संजय शिरसाट असेही म्हणाले की, ‘संजय राऊत म्हणतात की, जम्मूत निवडणुक लढवणार, पण देशात सगळीकडे तर डिपॉझिट जप्त झालंय. आम्ही त्यांना सांगणार की अमेरीकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणुकही त्यांनी लढवावी तिथेही फॉर्म भरावा कुठून येतो एवढा कांफिडेंस? हाच प्रश्न पडतो आहे.

धनुष्यबाण आम्हालाच 
शिवसेना आणि पक्ष चिन्ह धनुष्यबाण यांसंबंधीची सुनावणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरु आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाने आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये असंख्य चुका आहेत. त्यामुळे धनुष्यबाण आमचाच होणार आहे. आमचीच ताकद वाढणार उद्धव ठाकरे यांना आत्ता हे लक्षात येतं आहे , असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं आहे.

सेना भवनात फोटो लावतील 
संजय राऊत यांनी जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. यावरून संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. ते जम्मूत जाऊन राहूल गांधींना भेटले आहेत  पण सेना भवनात आत्ता राहूल गांधीला मिठी मारल्याचा फोटो लावतील.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण

महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक

मविआचा पाठिंबा म्हणजे पराभव निश्चित…
नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला, यावरूनही शिरसाट यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, ‘ शुभांगी पाटील ह्यांना मविआने पाठींबा दिलाय म्हणजेच त्या हरतील आत्ता कारण जसं राजकारण सुरू आहे त्यामुळे वाटतंय की त्यांचा पराजय निश्चित आहे, आणि सत्यजित तांबेच विजयी होतील

सरकार कोसळणार?
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी येत्या महिनाभरात शिंदे सरकार कोसळणार असल्याचं भाकित केलंय. त्यावरून शिरसाटांनी त्यांनाही टोला लगावला. ते म्हणाले, ‘ अमोल मिटकरी हे नवे भविष्य सांगणारे झाले आहेत कदाचित त्यांनी अजित दादांचं वागणं पाहून हे ट्विट केलं असावं अजित दादा कुठे जातील याचं कदाचित त्यांनी भाकित केलंय…

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा