24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणसंजय राऊत यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह, कालच झाली होती पवार-राऊत भेट

संजय राऊत यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह, कालच झाली होती पवार-राऊत भेट

Google News Follow

Related

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना कोरोनाची लक्षणं दिसत होती. अखेर त्यांची चाचणी केली असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. पत्नीला कोरोनाची लागण झाल्याने आता संजय राऊत यांनाही कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून वर्षा संजय राऊत यांना ताप, सर्दी खोकला होता. कोरोनाची लक्षणे असल्याचं समोर आल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली. ही चाचणी सकारात्मक आली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतल्या फोर्टीस रुग्णालयात दाखल केलं आहे. पत्नीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने संजय राऊत यांना नियमाप्रमाणे कोव्हिड चाचणी करावी लागणार आहे. तूर्तास तरी त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याची माहिती आहे.

राऊतांच्या घरात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्याने आता राष्ट्रवादीच्या गोटातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण, संजय राऊत यांनी नुकतीच ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली होती. त्यामुळे आता संजय राऊत यांनाही कोरोनाची लागण झाली असेल तर शरद पवार यांचे काय, अशी भीती अनेकांना सतावत आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल काय येतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हे ही वाचा:

नव्या कोरोनाची प्राणघातकता कमी

राहुल गांधी पाकिस्तानी ‘प्रॉपगॅन्डा’ चालवत आहेत का?

राजकीय मिस मॅनेजमेंट मुळे महाराष्ट्र इटलीच्या मार्गावर

बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर ‘या’ माजी अमेरिकन खासदाराने जगाला सुनावले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही कॉर्नची लागण झालेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा