राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे नेते अमित शहा यांच्या भेटीवरून सुरू झालेल्या तर्कवितर्कावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राजकीय वक्तव्य केलं आहे. पवार-शहा यांची गुप्त भेट झालीच नाही. त्यामुळे अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून ही हे आवाहन केलं आहे. मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
भाजपा सर्वच्या सर्व तीस जागा जिंकेल
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बंगालमध्ये ८०% तर आसाममध्ये ७३% मतदान
महाराष्ट्रात जमावबंदीची नियमावली जारी
पराभवाच्या भीतीने ममता बॅनर्जी त्रस्त, भाजपा कार्यकर्त्याला फोन करून मदतीची विनवणी
अर्ध्या तासापूर्वीच राऊत यांनी पवार-शहा यांच्या भेटीवर भाष्य केलं होतं. पवार-शहांची भेट झाली तर चूक काय? भेट झाली तर होऊ द्या. कामानिमित्त भेट झाली असेल तर चूक काय?, असं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच राऊत यांनी नवं ट्विट करून या भेटीच्या चर्चेचा फुगा फोडला आहे.
संजय राऊत यांच्या या यु-टर्नमुळे राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या प्रतिक्रियांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.