काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आणि याचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली. भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, मनसेने राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांच्या याच वक्तव्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडू शकते, असं सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
शुक्रवारी संजय राऊत माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नसल्याचं म्हटले आहेत. संजय राऊत म्हणाले, भारत जोडो यात्रेत वीर सावरकरांचा मुद्दा काढण्याची गरज नव्हती. इतिहासात काय घडलं, याकडे लक्ष देण्यापेक्षा राहुल गांधी यांनी नवा इतिहास निर्माण करण्याकडे लक्ष द्यावं. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतही फूट पडू शकते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राहुल गांधीचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या या वक्त्यव्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेस हे आमने सामाने येणार, अशी चर्चा रंगली आहे.
राहुल गांधींच्या या वादग्रस्त वक्त्यव्यानंतर राज्यात भाजपाचे ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. काल भाजपाने नागपूरमध्ये तर शिंदे गटाने ठाण्यामध्ये राहुल गांधींविरोधात आंदोलन केले. तर आज कुर्ल्यामध्ये शिंदे गटाचं राहुल गांधींविरोधात आंदोलन सुरु आहे. तसेच दादर आणि पुण्यामध्ये भाजपाचे आंदोलन सुरु असून, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यामध्ये भाजपाने काँग्रेस भवनावर मोर्चा नेला आहे. याशिवाय वीर सावरकरांचे असलेले गाव नाशिकमधील भगूरमध्येही भाजपा आणि शिंदे गटाचं आंदोलन सुरु आहे.
हे ही वाचा :
कर्नाटक सरकारचा ‘गो रक्षणा’साठी मोठा निर्णय
मनसे उधळणार राहुल गांधींची शेगावमधील सभा
भारतात येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ
आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रकल्पांना स्थगिती
राहुल गांधी यांची शेगाव मध्ये आज सभा होणार असून, मनसेने ती सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी मनसेचे कार्यकर्ते शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत.