संजय राऊतांची मालमत्ता ईडीकडून जप्त

संजय राऊतांची मालमत्ता ईडीकडून जप्त

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक मोठी बातमी कुठली आहे शिवसेना नेते आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी मार्फत जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या कारवाईमुळे संजय राऊत यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. दरम्यान ईडीच्या या कारवाईमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध केंद्रीय यंत्रणा हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे यांचा दादर येथील फ्लॅट ईडीकडून जप्त करण्यात आला आहे. तर त्यासोबतच अलिबाग येथील संजय राऊत यांच्या परिवाराशी संबंधित आठ जमिनीही जप्त करण्यात आल्या आहेत. पत्राचाळ घोटाळ्याशी संबंधित पैसा अलिबाग येथील जमिनी खरेदी करण्यासाठी वापरल्याचा ठपका संजय राऊत आणि कुटुंबीयांवर ठेवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

…म्हणून वृद्ध महिलेने आयुष्यभराची जमापुंजी केली राहुल गांधींच्या नावावर

गोरखनाथ मंदिर हल्लेखोराचे इस्लामिक स्टेट, सिरियाशी कनेक्शन

मुख्यमंत्री भेटत नाहीत; शिवसेनेच्या खासदारांची तक्रार

केमिकल इंजीनियर अब्बासीने केला गोरखपूर मठाच्या सुरक्षा जवानांवर हल्ला

काय आहे प्रकरण?
HDIL या रिअल इस्टेट कंपनीद्वारे पत्राचाळ जमीन घोटाळ्यामध्ये तब्बल १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात ५५ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. पण ईडीच्या चौकशीत वर्षा राऊत यांनी आपण हे पैसै कर्ज म्हणून घेतले होते, असा दावा केला होता. या वादानंतर त्यांनी पैसे परत केली होती. पण आता इतकी मोठी रक्कम का दिली गेली याची चौकशी ईडी करत होती. त्याच्याशी संबंधित आता ही कारवाई करण्यात आली आहे.

Exit mobile version