संजय राऊतांचा अटकपूर्व जामीन मंजूर

माझगाव न्यायालयाच्या निर्णयानंतर केला अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

संजय राऊतांचा अटकपूर्व जामीन मंजूर

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्याकडून तक्रार करण्यात आलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी त्यांना १५ दिवसांची कोठडी आणि २५ हजारांचा दंड सुनावण्यात आला. यानंतर संजय राऊत यांनी तातडीने न्यायालयाची दारे ठोठवली. संजय राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यानंतर त्यांचा जामीन मंजूर झाला आहे.

माझगाव न्यायालयाच्या निर्णयानंतर संजय राऊत यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. अखेर या प्रकरणात संजय राऊतांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. संजय राऊतांचा अटकपूर्व जामीन १५ हजारांच्या जातमुचलक्यावर मंजूर झाला आहे. शिवाय ३० दिवसांच्या आत वरच्या न्यायालयात अपील करून दाद मागण्याची मुभाही न्यायालयाकडून देण्यात आली आहे. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राऊत यांच्या वकिलाने शिक्षेला स्थगिती आणि जामीन मिळण्यासाठी दोन याचिका दाखल केल्या. ज्याला न्यायालयाने परवानगी दिली.

हे ही वाचा:

संजय राऊत म्हणतात, न्यायालयांचे संघीकरण झाले!

राहुल गांधी भारताचे की ब्रिटनचे नागरिक; उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्न

पावसाच्या व्यत्ययामुळे नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द!

४०० कोटींच्या ऑनलाइन गेमिंग घोटाळ्याचा पर्दाफार्श; चीनी नागरिकांची क्रिप्टो खाती गोठवली

प्रकरण काय?

मिरा- भाईंदर महापालिकेकडून शहरात सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली. त्यापैकी १६ शौचालयं बांधण्याचे कंत्राट भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला देण्यात आले होते. बनावट कागदपत्र सादर करुन मेधा सोमय्या यांनी मीरा- भाईंदर पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणी मेधा पाटकर यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी मानत १५ दिवसांची कोठडी आणि २५ हजारांचा दंड सुनावला.

Exit mobile version