पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे. यापूर्वी २३ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली होती त्यावेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली होती.
संजय राऊत हे सध्या आर्थर रोड तुरुंगात असून आज, ५ सप्टेंबर रोजी त्यांची न्यायालयीन कोठडी संपली होती. त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ १४ दिवसांची वाढ केली असून, १९ सप्टेंबर पर्यंत संजय राऊत यांचा मुक्काम कोठडीतच असणार आहे.
संजय राऊत यांना ३१ जुलैला ईडीने नऊ तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले होते. त्यानंतर ईडी कार्यालयातील चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली आणि चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. पुढे त्यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात झाली. पत्राचाळ गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार संजय राऊत आहेत. प्रवीण राऊत यांना फक्त पुढे केलं होत, असा आरोप ईडीने संजय राऊतांवर केला आहे.
हे ही वाचा:
५० फुटवरून झुला खाली आदळला आणि
राहुल गांधी मोजतात पीठ लिटरमध्ये
हिंदू संस्कृतीबद्दल डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी इंग्रजांना काय सुनावले?
शहेनशाह जहाँ बैठते है, दरबार वही लग जाते है…
तसेच, पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊत यांच्या खात्यातून अनके व्यवहार झाल्याचे ईडी वकिलाने सांगितले होते. अलिबाग येथील जमीन खरेदीवेळी राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर आलेल्या पैशांच्या संबंधात चौकशी करण्याची मागणी ईडीच्या वकिलांनी केली होती. या चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. काही दिवसांपूर्वीच ईडीने वर्षा राऊत यांचीसुद्धा आठ ते नऊ तास चौकशी केली होती.