संजय राऊतांचा तुरूंगातील मुक्काम वाढला

संजय राऊतांचा तुरूंगातील मुक्काम वाढला

पत्राचाळ प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. त्यांच्या जामीनाची पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला होणार आहे.

१० ऑक्टोबरला त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. त्यावेळी त्यांच्या कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर सोमवार, १७ ऑक्टोबर रोजी संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे राऊतांना आज, १८ ऑक्टोबरला पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली असून, २१ ऑक्टोबरला त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे.

यावेळी ईडीकडून सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. तर संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरंगी अजून काही लेखी मुद्दे सादर करणार आहेत. न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेत संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर २१ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. सुनावणी पार पडल्यानंतर संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांची भेट झाली, असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा

पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती

पाऊस पुण्यात पुणे पाण्यात

आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका

नायजेरियात महापुराची तयारीच नसल्याने गमावले शेकडो जीव

संजय राऊत यांना ३१ जुलैला ईडीने नऊ तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले होते. त्यानंतर ईडी कार्यालयातील चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली आणि चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. पुढे त्यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात झाली. पत्राचाळ गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार संजय राऊत आहेत. प्रवीण राऊत यांना फक्त पुढे केलं होत, असा आरोप ईडीने संजय राऊतांवर केला आहे.

Exit mobile version