संजय राऊत यांची कोठडी ४ दिवस वाढली

संजय राऊत यांची कोठडी ४ दिवस वाढली

पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक करत चार दिवसांची कोठडी सुनावली होती. आज, ४ ऑगस्ट रोजी त्यांची चार दिवसांची कोठडी संपली असून, संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सुनावणीत राऊतांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.

पीएमएलए न्यायालयाने संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने न्यायालयात १० ऑगस्टपर्यंत त्यांच्या कोठडीची मागणी केली होती. अलिबाग येथील जमीन खरेदीवेळी राऊतांच्या पत्नी वर्ष राऊत यांच्या खात्यावर आलेल्या पैशांच्या संबंधात चौकशी करण्याची मागणी ईडीच्या वकिलांनी केली होती. यावर संजय राऊत यांचे वकील मनोज मोहिते यांनी युक्तिवाद करताना, खात्यावर आलेले पैसे हे अनोळखी व्यक्तीने पाठवले असल्याचं सांगितलं आहे. हे पैसे कुणी आणि का पाठवले याची चौकशी करायची असल्याचं सांगत ईडीने राऊतांच्या कोठडीची मागणी केली होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून, पीएमएलए न्यायालयाने संजय राऊतांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा:

टोलसंबंधी नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

कर्माची फळं भोगणारे पार्थ चॅटर्जी खात असत अडीच लाखांची फळे

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा दबदबा; १८ पदकांसह भारत सातव्या क्रमांकावर

झाडू मारण्याचे काम करता करता त्या स्टेट बँकेत झाल्या सहाय्यक महाव्यवस्थापक

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊतांना ३१ जुलै रोजी ताब्यात घेतले आणि उशिरा रात्री त्यांना अटक केली. पत्राचाळ गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार संजय राऊत आहेत. प्रवीण राऊत यांना फक्त पुढे केलं होत, असा आरोप ईडीने संजय राऊतांवर केला आहे.

Exit mobile version