संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला

संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला

पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकारणी ईडीकडून अटक करण्यात आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. यापूर्वी ५ सेप्टेंबर रोजी सुनावणी झाली होती त्यावेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली होती.

संजय राऊत यांची आज, १९ सेप्टेंबर रोजी न्यायालयीन कोठडी संपली. त्यामुळे त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून, ४ ऑक्टोबर पर्यंत संजय राऊत यांचा मुक्काम कोठडीतच असणार आहे.

संजय राऊत यांना ३१ जुलैला ईडीने नऊ तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले होते. त्यानंतर ईडी कार्यालयातील चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली आणि चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. पुढे त्यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात झाली. पत्राचाळ गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार संजय राऊत आहेत. प्रवीण राऊत यांना फक्त पुढे केलं होत, असा आरोप ईडीने संजय राऊतांवर केला आहे.

हे ही वाचा:

पत्रकार विजय सिंह यांना पितृशोक

टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळाडू घालणार ‘हर फॅन की जर्सी’

जॅकलिनला पुन्हा ईडीचे समन्स

हॉस्टेलमधील ‘त्या’ मुलींचे व्हिडीओ काढणाऱ्या मुलीला शिक्षिकेने विचारला जाब

तसेच, पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी वर्षा राऊत यांच्या खात्यातून अनके व्यवहार झाल्याचे ईडी वकिलाने सांगितले होते. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स पाठवले होते आणि त्यांचीही तब्बल १० तास चौकशी झाली होती.

Exit mobile version