संजय राऊतांच्या कष्टाची कमाई कोट्यवधींची

संजय राऊतांच्या कष्टाची कमाई कोट्यवधींची

शिवसेना नेते आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची मालमत्ता आज ईडीमार्फत जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर संजय राऊत यांनी असत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर अशा कारवाईने संजय राऊत घाबरणार नाही, मी तुमच्या बापालाही घाबरत नाही असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

माझ्याकडे कोणतीच संपत्ती नाही. माझे राहते घर आणि थोडीशी जमीन याला संपत्ती म्हणत असाल तर संपत्तीची व्याख्या बदलावी लगेल. जी जमीन आहे ती एक एकर देखील नाही. २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली जागा आहे. पण आजवर त्याची साधी आमच्याकडे चौकशी पण केली नाही, विचारणा केली नाही. पण आता ईडीने आज जप्त केल्याचे कळले. पण त्यापैकी एक रुपया जरी घोटाळ्याचा असेल तर आम्ही सर्व मालमत्ता भारतीय जनता पक्षाला दान करायला तयार आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत. तर ही संपूर्ण कारवाई राजकीय सूडापोटी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

हे ही वाचा:

…म्हणून वृद्ध महिलेने आयुष्यभराची जमापुंजी केली राहुल गांधींच्या नावावर

संजय राऊतांची मालमत्ता ईडीकडून जप्त

मुख्यमंत्री भेटत नाहीत; शिवसेनेच्या खासदारांची तक्रार

केमिकल इंजीनियर अब्बासीने केला गोरखपूर मठाच्या सुरक्षा जवानांवर हल्ला

मुंबईतील माझे राहते घरी जप्त केले. या कारवाईमुळे भाजपाचे काही लोक फटाके फोडत आहेत. मराठी माणसाचे राहते घर जप्त झाल्याचा त्यांना आनंद होत आहे. असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा मराठी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. या कारवाईच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बातचीत केल्याची माहिती दिली. तर त्यांनी या कारवाईबद्दल चिंता व्यक्त केल्याचे संजय राऊतांनी सांगितले. तर मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मागे हटणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. या सर्व कारवाईनंतर त्यांनी असत्यमेव जयते असे ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version