शिवसेना खासदार संजय राऊत हे उद्या भाजप विरोधात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे म्हटले आहे. उद्या शिवसेनेची पत्रकार परिषद होईल. मीही असेल. शिवसेनेचे खासदार, आमदार, मंत्री आणि पदाधिकारी असतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. ही पत्रकार परिषद फक्त शिवसेनेची असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विरोधी पक्ष असलेल्या भाजप विरुद्ध मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे त्यांनी म्हटले असले तरी पत्रकार परिषद ही केवळ शिवसेनेची असणार आहे. महाविकास आघाडीमधील इतर दोन पक्ष यात नसतील यामुळे महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये असलेली अंतर्गत नाराजी पुन्हा समोर आल्याची चर्चा आहे.
उद्या आम्ही बोलणार तेव्हा संपूर्ण देश ऐकेल. उद्या काय होतं ते बघाच. आता मी काहीच सांगणार नाही. उद्याच काय ते सांगू, असे संजय राऊत म्हणाले. ‘हमने बहोत बर्दाश्त किया है, अब बर्बाद भी हम करेंगे,’ असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच भाजपचे साडेतीन नेते लवकरच तुरुंगात असतील असेही ते म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून भाजपचे ते तीन नेते कोण? असा सवालही उपस्थित झाला आहे.
हे ही वाचा:
‘काँग्रेसचे आंदोलन म्हणजे नाना पटोलेंची नौटंकी’
नाना पटोलेंचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले
काँग्रेसचे आंदोलन; भाजपा कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
२०२२ मधील इस्रोची पहिली मोहीम फत्ते
गेल्या काही दिवसांपासून जी काही दादागिरी चालली आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेना, ठाकरे परिवारावर आरोपांचा चिखल उडवला जातोय त्याला आम्ही उत्तर देऊ. हा जेलमध्ये जाईल तो जेलमध्ये जाईल. देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत असेल असे बोलले जात आहे, असे संजय राऊत म्हणाले. आता देशमुख कोठडीबाहेर असतील आणि भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. आम्ही धमक्यांना घाबरत नाही. मी तर नाहीच नाही. एजन्सी आणि सरकारला जे उखडायचे ते उखडा, असेही संजय राऊत म्हणाले.