संजय राऊत आज ईडीसमोर हजर होणार

संजय राऊत आज ईडीसमोर हजर होणार

शिवसेना खासदार संजय राऊत यांना २७ जून रोजी ईडीने समन्स बजावलं होतं. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने हे समन्स बजावला होता. त्यानंतर संजय राऊत आज ईडी चौकशीसाठी जाणार आहेत.

काल, ३० जून रोजी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, “बहुदा शुक्रवारी दुपारनंतर मी ईडीसमोर हजर होणार आहे. ईडीसमोर भूमिका स्पष्ट करणार असून पक्षाच्या कामांपासून रोखण्यासाठी, महाराष्ट्राच्या कामापासून रोखण्यासाठी हे सर्व सुरु आहे. या दबावांना बळी पडून आमचे काही लोक पळून गेले असले, तरी मी आजच ईडीसमोर हजर राहीन, कारवाई झाल्यास सामोरा जाईन,” असं म्हटलं होतं. त्यामुळे आज संजय राऊत ईडीसमोर हजर होणार आहेत.

संजय राऊत यांनी ट्वीट करून देखील आज हजर होणार असल्याचे सांगितले आहे. “मी आज दुपारी १२ वाजता ईडीसमोर हजर होणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणं हे माझे कर्तव्य आहे. मी शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये, असं आवाहन करतो,” असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

हे ही वाचा:

सेटलवाड अटकेविरोधातील आंदोलनात कॅथलिक समाजाला ओढले जात आहे!

मिलिंद घाग महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष

एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, फडणवीस उपमुख्यमंत्री!

ही हिंदु्त्वाची लढाई आहे, आम्हाला पदे नको होती!

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीनं संजय राऊत यांना हे समन्स बजावण्यात आलं आहे. डीएचएफएल केसमध्येही त्यांना आरोपी बनवण्यात आलं आहे. ईडीने सीबीआयच्या गुन्ह्याचा आधार घेत डीएचएफएल बँक घोटाळ्यात नवीन मनी लाँड्रिंग गुन्हा दाखल केला आहे. यात संजय राऊत हे आरोपी आहेत. संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात समन्स देण्यात आले असून डीएचएफएल प्रकरणातही त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या ईडीकडे संजय राऊत यांच्याविरोधातील दोन प्रकरणाचा तपास आहे.

Exit mobile version