वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा
शिवसेना खासदार यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतरही त्यांच्यासमोरील अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. आता वाकोला पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी ही तक्रार करण्यात आली असून भादवी कलम ५०४, ५०६ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्ना पाटकर यांचा पुन्हा एकदा जबाब नोंदविण्यात आला असून त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्यातील संवादाची क्लिप नुकतीच बाहेर आली. ती सध्या सगळीकडे व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये संजय राऊत पाटकर यांना अत्यंत घाणेरड्या शिव्या देताना ऐकू येतात. आपल्या हत्येची धमकी दिल्याचा आरोपही या महिलेने केलेला आहे. याबाबत पाटकर यांनी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांना ती क्लिपही देण्यात आली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत.
हे ही वाचा:
आठ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक!
संजय राऊतांच्या घरातून ११.५० लाखांची रोकड जप्त
अॅक्सेल श्वानाने झेलल्या तीन गोळ्या; पण त्याने दहशतवाद्यांना शोधले
सीमाभागातील लोकांना जोडण्याचा ‘असीम’ आनंद
या क्लिपमध्ये एक शहाणपणा करायचा नाही. तू मला काय समजतेस, माझ्या नादाला लागायचे नाही. तुझी लायकी आहे का, तुझी लायकी दाखवेन मला अशी काही वाक्ये आहेत पण त्यात शिव्यांचा भरपूर वापर करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी ७ वाजता ईडीने संजय राऊत यांच्या घरी धडक दिली. तब्बल ९.३० तास ईडीचे १० अधिकारी चौकशी करत होते. त्यानंतर त्यांना संध्याकाळी ताब्यात घेण्यात आले. तिथून मग राऊत यांना ईडीच्या फोर्ट येथील कार्यालयात नेण्यात आले. तिथेही सहा तास चौकशी झालेली होती. रात्री त्यांना उशिरा