भाजपा नेते मोहित कंबोज यांचा राऊतांवर आरोप
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माझ्याकडून पैसे घेतले, ते आजपर्यंत परत केलेले नाहीत, असे भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी म्हटले आहे. राऊतचे माफिया लकडावालाशीही संबंध होते आणि राऊत हे लकडावाला यांच्या महाबळेश्वरच्या रिसॉर्टमध्ये राहायचे, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या मृत्यूनंतर कोणावर आरोप करणे चुकीचे असल्याचे भाजपा नेत्याने म्हटले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, विलासराव देशमुख, राजीव गांधी यांचेही युसूफ लकडावाला यांच्याशी संबंध होते. कंबोज यांनी बुधवारी लकडावाला यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राजीव गांधी यांचे फोटो प्रसिद्ध केले.
मोहित पुढे म्हणाले, “राणा दाम्पत्याने विचारधारेच्या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरल्यास त्यांच्याकडे बचावाचा कोणताही मार्ग नाही. त्यामुळे निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती समोर आणून आरोप केला जात आहे. शिवसेनेने मोर्चा काढलेल्या राणांच्या समोरचे घर युसूफ लकडावाला यांनी बांधले होते. राणा दाम्पत्याने लकडावाला यांच्याकडून घर विकत घेतले आणि त्यासाठी पैसे दिले आहेत. ”
दरम्यान, फरारी माफिया किंगपिन दाऊद इब्राहिमच्या जवळ असलेल्या युसूफ लकडावाला याच्याकडून ८० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याच्या आरोपांसंदर्भात खासदार नवनीत राणा यांची चौकशी केली जाईल, असे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. बुधवारी पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले की, लकडावाला यांच्यासोबत आर्थिक व्यवहार करणे बेकायदेशीर, चुकीचे आणि हानिकारक आहे. याप्रकरणी तक्रार आल्यावर कारवाई केली जाईल.
खासदार नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला यांच्याकडून ८० लाखांचे कर्ज घेतल्याच्या संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची मुंबई पोलीस आणि अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी करावी, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.भुजबळ म्हणाले, दाऊदच्या निकटवर्तीयाकडून पाच लाख रुपयांची जमीन खरेदी केल्याप्रकरणी नवाब मलिकवर कारवाई करण्यात आली, त्यानंतर या प्रकरणाचीही कारवाई व्हायला हवी. तसेच न्यायालयाने आधीच सांगितले आहे की, नवनीत राणा दलित वर्गातील नाहीत. या आदेशाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्या मागासवर्गीय आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे, असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
कराची विद्यापीठात स्फोट करणारी महिला दोन मुलांची आई
प्रशांत किशोर यांना अहमद पटेल व्हायचं होतं…
मराठा विद्यार्थ्यांच्या मंत्रालयात गराडा
“जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर आता आकारत असलेला अतिरिक्त कर परत करणार का?”
नवनीत कौर राणा यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांना पत्र लिहून संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राऊत यांनी आपल्यावर असभ्य आणि जातीयवादी वक्तव्य केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.