संजय राऊत यांनी सांगितले, सरकारचा कारभार आटोपला

संजय राऊत यांनी सांगितले, सरकारचा कारभार आटोपला

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे ४० पेक्षा जास्त आमदारांना घेऊन गुवाहाटीला दाखल झाल्याची माहिती आहे. अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना मोठे विधान केले. जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल, मात्र आम्ही लढू असे वक्त्यव्य संजय राऊतांनी केले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत असेल तर ठाकरे सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी सूचक असे ट्विट केले आहे. “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने,” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊतांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच ठाकरे सरकारचे काउंट डाऊन सुरू झाले आहे का? अशा चर्चांना आता उधाण आले आहे.

हे ही वाचा:

‘जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल’

राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण

ठाकरे सरकार अडचणीत; ४० पेक्षा जास्त आमदार सोबत असल्याचा शिंदेंचा दावा

महिंद्रा ग्रुपनंतर ही कंपनी देणार अग्निवीरांना नोकरी

२१ जून रोजी एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे अनेक आमदार गुजरातला गेले होते. त्यानंतर पहिले तेरा आमदार सोबत असल्याची माहिती समोर आली त्यानंतर २३ आमदार सोबत आहेत, अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर खुद्द एकनाथ शिदे यांनी ४० पेक्षा जास्त आमदार सोबत असल्याचा दावा केला आहे. या आमदारांना काल रात्री उशिरा आसाममधल्या गुवाहाटी इथं नेण्यात आलं आहे. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Exit mobile version