शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून ममता बॅनर्जी यांची पाठराखण केली आहे. संजय राऊत यांनी पश्चिम बंगालमधील हिंसाचार थांबवण्याची मागणी केली आहे. पण त्याचवेळी राऊत आपला भाजपविरोधी अजेंडा लपवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी बंगाल हिंसेचा विषय देशपातळीवर नेण्याचा प्रयत्न केला.
मंगळवार, ४ मे रोजी पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालमधील हिंसाचार थांबवण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे असे म्हटले. बंगालला रक्तपाताचा इतिहास राहिला आहे असे राऊत म्हणाले. मतमोजणीनंतर बंगालमध्ये होणारी हिंसा ही काही नवीन बाब नाही. ह्या हिंसेचा एक मोठा इतिहास आहे. ही हिंसा दुर्दुवी आहे. हिंसा करणारे बंगालचे आहेत की बंगालच्या बाहेरचे याचा तपास व्हायला हवा असे राऊत म्हणाले.
हे ही वाचा:
ठाकरे सरकार इम्तियाज जलील यांची मागणी मान्य करणार का?
पण याचवेळी राऊतांनी ममता बॅनर्जी यांची पाठराखण करायचाही प्रयत्न केला. ही हिंसा रोखण्याची जबाबदारी निश्चितच ममता बॅनर्जी यांची आहे. पण टाळी कधीच एका हाताने वाजत नाही असे राऊतांनी म्हटले आहे. हिंसा ही नक्कीच दुर्दैवी आहे. बंगालमध्ये हिंसा कोण भडकवत आहे याचा तपास झाला पाहिजे. पण सध्या सगळ्यांना देशाची परिस्थिती बघितली पाहिजे. देशातील कोरोना परिस्थिती बघून त्यानुसार काम केले पाहिजे. ही वेळ एकमेकांना धमक्या देण्याची नाही.