संजय राऊतांनी ढापले ५५ लाख रुपये

संजय राऊतांनी ढापले ५५ लाख रुपये

भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या हे आज मुंबईत दाखल झाले. मुंबईत दाखल झाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा आपली तोफ लागली आहे. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ५५ लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमैय्या यांनी केला आहे. बीएमसी बँकेशी संबंधित हा घोटाळा असल्याचे सोमैय्या यांनी म्हटले आहे.

गेल्या चोवीस तासांपेक्षा अधिक काळ किरीट सोमैय्या माध्‍यमांमध्‍ये चांगलेच गाजत आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप करणारे सोमैय्या हे कोल्हापूरला जाणार होते. पण त्यांच्यावर कोल्हापूर जिल्हाबंदी लागू करण्यात आल्यामुळे कराड येथे त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. तेव्हा सोमवारी सोमैय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी हसन मुश्रीफ यांच्यावर सोमैय्यांनी १०० कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केले. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्यावरही घोटाळ्याचे आरोप केले आहेत.

हे ही वाचा:

५ ते ११ वयोगटासाठी फायझरची नवी लस लवकरच उपलब्ध होणार

काय आहे सीडीएस बिपीन रावत यांनी सांगितलेला ‘संस्कृतींचा संघर्ष’?

काँग्रेस शासित राजस्थानमध्ये हिंदू मुलाचे ‘लिंचिंग’

तक्रारदार स्थानबद्ध तर गावगुंड राज्यभर मुक्त

तर मुंबई येथे दाखल झाल्यावर सोमैय्या यांनी आपला मोर्चा सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांच्याकडे वळवला आहे. “शिवसेना प्रवक्ते संजय राऊत असे म्हणाले की किरीट सोमैय्या सोबत जे झाले त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही. हे तेच आहेत ज्यांनी बीएमसी बँकेच्या डिपॉझिटर्सचे ५५ लाख रुपये ढापले होते आणि हा चोरीचा माल त्यांना परत करावा लागला होता. सोमैय्यांचा या आरोपानंतर शिवसेना विरुद्ध किरीट सोमैय्या हा वाद आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत
किरीट सोमैय्या हे मुंबईत दाखल होताच भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे. सोमैय्या यांना खांद्यावर उचलून घेत कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाचा जयजयकार केला. तर काल कोल्हापूरच्या दिशेने रवाना होत असतानाही निरनिराळ्या रेल्वे स्थानकांवर भाजपा कार्यकर्ते सोमैय्या यांचे स्वागत करताना दिसले होते.

Exit mobile version