शिवसेनेच्या ‘सोशल सैनिकांना’ संजय राऊतांचे शिव्यांचे धडे

शिवसेनेच्या ‘सोशल सैनिकांना’ संजय राऊतांचे शिव्यांचे धडे

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांना शिव्यांचे धडे दिले आहेत. शिवसेनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोशल मीडियावरील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राऊत बोलत होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी नवीन प्रमाणे भारतीय जनता पार्टीवर टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला.

गेले काही महिने महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध भाजपा हा संघर्ष सुरू असतानाच संजय राऊत विरुद्ध किरीट सोमय्या असा ही सामना करताना पाहायला मिळत आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असून समोरच्याला जेलमध्ये पाठवणार असल्याचा दावा करत असतात.

हे ही वाचा:

कुमार विश्वास यांनी देशातील जनतेला दिली एक गंभीर वॉर्निंग

म्हसळा जवळील घोणसे घाटात बस कोसळली दरीत

‘ठाकरे सरकराने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या’

तारापूरमध्ये स्टील कारखान्याच्या कामगारांवर जमावाचा हल्ला, १९ पोलीस जखमी

पण हे करत असताना अनेकदा संजय राऊत यांच्याकडून समाजासाठी अपशब्द वापरण्यात आले आहेत. माध्यमांशी बोलताना पत्रकार परिषदांमध्ये राऊत सातत्याने हे शिवराळ भाषेचा वापर यांच्या विरोधात करत असतात. तशाच प्रकारचे काहीसे आज शिवसेनेचा या सोशल मीडिया सैनिकांच्या मेळाव्यातही घडताना पाहायला मिळाले.

किरीट सोमय्या यांचा उल्लेख करताना संजय राऊत आपल्या भाषणात ‘मुलुंडचा कोण तो?’ एवढाच उल्लेख करून ते थांबले. संजय राऊत यांचा या प्रश्नावर उपस्थितांकडून शिवराळ भाषेत उत्तरे देण्यात आली. तर संजय राऊत यांनीही कुठे ही शिवराळ भाषा थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट ते त्याला प्रोत्साहन देताना दिसले. त्यामुळे सोशल मीडियावरील शिवसैनिकांना संजय राऊत शिव्यांचे धडे देत होते का? असा प्रश्न निर्माण होतो.

शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते, समर्थक समाज माध्यमांवर ही विरोधी पक्षाच्या नेत्यांना समर्थकांना शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना शिवराळ भाषेत ट्रोल करताना दिसत असतात. त्याचे बाळकडू हे इथूनच मिळते का? असाही प्रश्न विचारायला वाव आहे.

Exit mobile version