24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारण‘संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले!’

‘संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले!’

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा राऊतांचा प्रयत्न

Google News Follow

Related

आपल्या विचित्र प्रतिक्रियांमधून सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहणारे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी नव्याने चिखलफेक केली. त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक परदेशातील फोटो शेअर करत त्यावरून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

बावनकुळे हे सध्या आपल्या कुटुंबासह परदेशात आहेत. तिथे ते एका कॅसिनोत बसलेले असतानाचे छायाचित्र संजय राऊत यांनी आपल्या एक्स हँडलवर टाकले आणि त्यांच्यावर टीका केली. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र पेटलेला असताना महाराष्ट्रातला एक माणूस परदेशात जाऊन कॅसिनोत साडेतीन कोटी उधळतो. ज्या व्यक्तीचा फोटो आहे त्याने हे सांगावे की, फोटोतील व्यक्ती आपण नाही. मी वैयक्तिक आयुष्यात आनंदावर विरजण घालू इच्छित नाही पण महाऱाष्ट्रात काय चालले आहे?

राऊत यांच्या आरोपांनंतर स्वतः बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले. मकाऊतील हा फोटो असल्याचे बावनकुळे म्हणाले. तसेच आपण या हॉटेलमध्ये सहकुटुंब सहपरिवार राहात आहोत. तिथे रेस्तराँ आणि कॅसिनो एकाचठिकाणी आहेत. तिथे बसलेलो असताना आपला फोटो काढण्यात आला.

त्यावर राऊत यांनी आपल्याकडे असे २७ फोटो आणि पाच व्हीडिओ असल्याचे म्हटले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांचे हे वागणे हे विकृत मनोवृत्तीचे लक्षण असल्याची टीका केली. तर मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार यांनी दिवसाढवळ्या गांजा आणि चिलीम ओढणारे आता दुसऱ्यावर आरोप करताहेत अशा शब्दांत राऊत यांना लक्ष्य केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी अशी अजब मागणी केली.

हे ही वाचा:

पोलीस कॉन्स्टेबलची लायब्ररीमध्ये गळफास लावून आत्महत्या

आता करा की ट्विट!

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्री फडणवीसांचे नाहीत!

अबब!! १९२६ सालच्या दुर्मिळ मॅकलन व्हिस्कीसाठी मोजले २.७ मिलियन डॉलर्स

 

मोहित कंबोज यांनीही संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे. संजय राऊत हे राजकारण सोडून लोकांच्या खासगी जीवनात डोकावत आहेत. त्यांनी डिटेक्टिव्ह एजन्सी उघडली आहे का?. सलीम जावेद पैकी या जावेद भाईने एक फोटो ट्विट केला. त्यात बावनकुळे हे दिवाळीच्या निमित्ताने विदेशात गेले आहेत. त्यात हॉटेलातील कॅसिनोत ते बसले आहेत असे दिसते. ते खेळत होते की नाही हे माहीत नाही. जर ते खेळत आहेत तरी अशा प्रकारचे कॅसिनो भारतातही आहेत. पण त्यासाठी एवढ्या खालच्या स्तरावरचे राजकारण जर संजय राऊत करत असतील तर आपल्या परिवारातील लोक लंडनमध्ये जातात तेव्हा त्यामागेही काही लोक कॅमेरा घेऊन पाठवले आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली तर…

 

कंबोज यांनी म्हटले आहे की, संजय राऊत असे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करत असतील. तर त्यातून त्यांची मानसिकता दिसते. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. माझी विनंती आहे की आपल्याकडे माझे २५ लाख रुपये आहेत ते आपण मला दिलेले नाहीत. पण त्या पैशातून आपण स्वतःवर उपचार करा. २०१९नंतर आपले मानसिक संतुलन बिघडले आहे. वय वाढते आहे तसे आपण एका आजाराला बळी पडला आहात. त्या पैशातून या आजारवर उपचार करा.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा