राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठं विधान केलं आहे. ‘वर्षा’ निवासस्थानात आज शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी २४ तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी असे आवाहन संजय राऊत यांनी दिले.
बंड करणाऱ्या आमदारांना वेगळा विचार करावा असे वाटत असेल तर तोदेखील विचार करू. मात्र, तुम्ही आधी २४ तासात मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी. मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करावी, असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार जर्मनी, युएई दौऱ्यावर
मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ सोडताच आणखी दोन आमदार गुहावटीत
मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात तक्रार दाखल
२१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला असल्याचं राऊत म्हणाले आहेत. ज्यादिवशी मुंबईला येतील तेव्हा २१ आमदार शिवसेनेसोबत असतील. सर्वांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीचा विजय होईल इतका आकडा आमच्याकडे आहे, असा दावा ऱाऊतांनी केला आहे.