संजय राऊत यांनी अखेर मौन सोडले

संजय राऊत यांनी अखेर मौन सोडले

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी २९ मार्च रोजी एक ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, “कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता हैं…” असं ट्विट केल्यानंतर संजय राऊत हे रोज सकाळी माध्यमांशी बोलत असतात ते बोलणार नाही किंवा विरोधकांना उत्तर देणार नाहीत का? असे प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, ट्विट केल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भाजपा खासदार वरुण गांधी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आले होते. दरम्यान आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ही भेट फक्त सदिच्छा भेट असल्याचे म्हटले. त्यांचे ठाकरे परिवाराशीही घनिष्ठ संबंध आहेत त्यामुळे भेट घेतल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे युपीएचे अध्यक्ष व्हावे, याचे आम्ही स्वागत करू असे ते म्हणाले. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. विरोधकांना एकत्र आणायचं असेल तर शरद पवार हे काम करू शकतात म्हणून हीच भूमिका सातत्याने समोर येत आहे, असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर पेट्रोल बॉम्ब हल्ला

आपल्या शरीरातही जाते या मार्गाने प्लास्टिक

मोहित कंबोज यांची मागणी; मशिदींवर बेकायदेशीर भोंगे हटवा!

महाराष्ट्रातील या ठिकाणांवर होणार ग्रीनफिल्ड विमानतळ

यावेळी त्यांनी कोकणातील नाणार प्रकल्पावरही भाष्य केले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या प्रकल्पाला काही स्थानिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा प्रश्न मार्गी कसा लागणार याकडे लक्ष आहे. “नाणार प्रकल्पाला खीळ घालण्यासाठी शिवसेनेने कधी पुढाकार घेतला नाही, आजही तिकडे आंदोलन सुरू आहे. मात्र, प्रकल्प होऊ नये असे नाही. रिफायनरीला काही स्थानिकांचा विरोध आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Exit mobile version