संजय राऊत म्हणतात, शिवराळ भाषेत माझ्या वेदना

संजय राऊत म्हणतात, शिवराळ भाषेत माझ्या वेदना

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवार, १२ डिसेंबर रोजी महाविकास आघाडी सरकारवर आणि नेत्यांवर सडकून टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही राज ठाकरे यांनी निशाणा साधला होता. ताव्रून संजय राऊत यांनी आज राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

दिव विझण्याच्या आधी दिवा फडफडतो आणि थोडा मोठा होतो तसे राज ठाकरे यांचे झाले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायची गरज नाही ते आमच्या रक्तात आहे. समोरून लढता आलं नाही की असे भाषण देतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

राज ठाकरे हे भाजपचा भोंगा आहेत. ईडी कारवाईमधून त्यांना केंद्राकडून अभय मिळाले आहे त्यामुळे हा भोंगा वाजत असल्याचे संजय राऊत म्हणाले. भाजपाने भोंगे वाजवले ते चालले नाहीत म्हणून हा नवा भोंगा वाजवत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. सरकारला अल्टिमेटम देण्याची ताकद आणि कुवत इतर कोणामध्येच नाही. ती ताकद फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्येच होती. त्यांनी दहशतवाद्यांनाही अल्टिमेटम दिला होता. महाविकास आघाडी सरकार हे भक्कम आहे.

हे ही वाचा:

श्रीलंकेने स्वतःला केले दिवाळखोर घोषित!

मुंबईत १० कोटींचा ड्रग्स जप्त, दोन नायजेरियन अटकेत

धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका

‘दहशत माजवण्याचा मविआ कडून प्रयत्न’

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याबद्दल शिवराळ भाषेत बोललो यावरून राज ठाकरे यांनी टीका करण्यापेक्षा कौतुक करायला हवे होते. त्यांनी अभिनंदन केले असते तर त्यांच मराठी प्रेम दिसलं असत. आपण अशी भाषा का वापरली हे समजून घेतलं असतं तर त्यांना माझ्या वेदना समजल्या असत्या. किरीट सोमय्या यांचा शिवतीर्थावर सत्कार करा. शिवसैनिकांच्या तोंडून निघालेला हा अंगार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Exit mobile version