24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारण'सोमय्यांनी आधी हिशोब द्यावा मग मी पुरावे देतो'

‘सोमय्यांनी आधी हिशोब द्यावा मग मी पुरावे देतो’

Google News Follow

Related

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने मंगळवार, ५ एप्रिल रोजी कारवाई केल्यानंतर काल ६ एप्रिल रोजी संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. INS विक्रांत वाचवण्यासाठी म्हणून सोमय्या यांनी निधी जमा केला होता. मात्र, तो नंतर राज्यपाल कार्यालयात पोहचलाच नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी पुरावे समोर आणा अशी मागणी करताच त्यांनी सोमय्या यांनी आधी हिशोब द्यावा मग मी पुरावे देईन, अशी पळवाट संजय राऊत यांनी काढली आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना भाजपा नेत्यांवर टीका केली. किरीट सोमय्या यांच्यासारख्या गद्दाराला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. INS विक्रांतसाठी जमा केलेले पैसे किरीट सोमय्या यांनी निवडणुकीला वापरले. हे पैसे जमा करण्यासाठी ७०० बॉक्स वापरले होते. हे सगळे बॉक्स किरीट सोमय्या यांच्या मुलुंडच्या कार्यालयात जमा करण्यात आले होते आणि हे पैसे मोजायला कार्यकर्ते जमले होते, असे आरोप संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केले.

कोरोडो रुपये पीएमसी बँकेच्या माध्यमातून वळवले. त्यांचे काही बिल्डर मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून हे पैसे वळवले. बिल्डरांची नावं पोलिसांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. नील सोमय्या यांच्या व्यवसायातही हे पैसे वापरले, अशी टीका संजय राऊत यांनी केली. आधी यांनी या करोडो रुपयांचा हिशोब द्यावा मग मी पुरावे देतो, असे वक्तव्यही संजय राऊत यांनी केले.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे आश्चर्य वाटत आहे. ते राष्ट्रीय स्वयं संघाचे कार्यकर्ते आहेत. हिंदुत्व आणि राष्ट्र्भक्तीवर ते बोलत असतात आणि आता देशद्रोही व्यक्तीची बाजू घेतात, असे संजय राऊत म्हणाले. राजभवनाने पुरावे देऊन पण तुम्ही त्यांची बाजू घेता. अशा भ्रष्टाचार करणाऱ्याला  त्यांनी जोडे मारायला हवेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

या घोटाळा प्रकरणातही पीएमएलए लागू शकतो. जर ईडी भाजपाची पपेट नसेल तर याचा तपास व्हावा, असेही ते म्हणाले. तसेच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेव्हा ते आमच्यासाठी बोलले. आमच्यावर कसे आरोप केले हे सांगितले त्याबद्दल त्यांनी शरद पवारांचे आभार मानले.

हे ही वाचा:

सोमय्या पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल

येवा नेपाळ आपलाच आसा

धक्कादायक! राज्यमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये मुलं पुस्तकात बघून लिहितायत उत्तरं

हिजाब वाद पेटवायला अल कायदाचे तेल?

संजय राऊत यांनी काल केलेल्या आरोपानंतर किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना आव्हान दिले होते. तुम्ही पुरावे मुख्यमंत्र्यांना द्या, असे किरीट सोमय्या म्हणाले होते. आतापर्यंत १७ आरोप केलेत त्याचं काय झालं? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा