संजय राऊतांना पुरावे समोर आणायला मुहूर्त मिळेना  

संजय राऊतांना पुरावे समोर आणायला मुहूर्त मिळेना  

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा साडे तीन लोकांची नावं समोर येणार असल्याचे म्हटले आहे. शिवसेना भवनात संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नव्हते. भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर त्यांनी आरोप केले होते. पिता-पुत्र तुरुंगात जाणार असेही त्यांनी सांगितले होते.

आजही प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ‘बाप बेट्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. माझे शब्द लिहून ठेवा. आय रिपीट मार्क माय वर्ड,’ मात्र, आता पत्रकार परिषदेला इतके दिवस होऊनही त्यांनी कोणतेही पुरावे समोर आणलेले नाहीत. त्या साडेतीन नेत्यांची नावेही त्यांनी उघड केलेली नाही.

बाप-बेटे तुरुंगात जाणार आहेत. ते मी पहिल्यापासून बोलत आहे. पीएमसी घोटाळा आणि इतर भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत. खंडणीची प्रकरणे आहेत. हळूहळू सगळ बाहेर येत आहे. बाप-बेटे अटकपूर्व जामिनासाठी का पळत आहेत? जेव्हापासून मी भ्रष्टाचार बाहेर काढला तेव्हापासून अटकपूर्व जामिनासाठी या कोर्टातून त्या कोर्टात जात आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

हे ही वाचा:

आयएनएस विशाखापट्टणम पीएफआरमध्ये प्रथमच सहभागी

युक्रेनमध्ये व्होडाफोनसह अनेक टेलिकॉम कंपन्या देणार फ्री कॉलींग

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

‘काचा बदाम’ फेम भुबन बड्याकर यांचा अपघात

आतापर्यंत मी यात पडलो नव्हतो. आता मी समोर आलो आहे. आता तुमच्या प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय मी राहणार नाही, अशी टीका त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. अपहरण, दहशतवाद, वसुली आदी प्रकरणे हाती आली आहेत. काही प्रकरणे पंतप्रधान कार्यालयाला दिली आहेत. काही ठेवली आहेत. अधिवेशन संपल्यावर सांगेन, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

Exit mobile version