संजय राऊत म्हणतात, न्यायालयांचे संघीकरण झाले!

अब्रुनुकसानीच्या खटल्यातील निकालावरून आगपाखड

संजय राऊत म्हणतात, न्यायालयांचे संघीकरण झाले!

शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी आढळले असून मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. माझगाव न्यायालयाकडून संजय राऊतांना २५ हजारांचा दंड आणि १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावरून संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत न्यायव्यवस्थेवर टीका केली आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रकरणी वरच्या न्यायालयात अपील करू, सेशन कोर्टात जाऊ असं त्यांनी म्हटलं आहे. संजय राऊत म्हणाले की, मिरा- भाईंदर भागात युवक प्रतिष्ठान नावाची संस्था असून त्या संस्थेला काही शौचालय बनवण्याचे काम मिळाले होते. त्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मी केलेला नाही. हा आरोप मीरा-भाईंदर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केला आहे. त्यांनी याबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यावर मिरा- भाईंदर महापालिकेच्या कामामध्ये गडबड आहे, असा एक अहवाल आहे. त्यानंतर तेथील आमदार प्रताप सरनाईक त्यांनी राज्य सरकारला या घोटाळ्यासंदर्भात एक पत्र लिहिलेले आहे आणि चौकशीची मागणी केलेली आहे. विधानसभेत याबाबत प्रश्न विचारले गेले आहेत. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात विधानसभेत आदेश पारित करण्यात आला. यात मी केवळ लोकांसमोर हा मुद्दा आणला. मी केवळ प्रश्न विचारले. यात मी अब्रुनुकसान कुठे केली? पहिले अब्रुनुकसान हे प्रवीण पाटील यांनी केली. दुसरी मिरा- भाईंदर नगरपालिकेने, तिसरी प्रताप सरनाईक यांनी आणि चौथी राज्याच्या विधानसभेत केली, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधी भारताचे की ब्रिटनचे नागरिक; उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्न

पावसाच्या व्यत्ययामुळे नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द!

४०० कोटींच्या ऑनलाइन गेमिंग घोटाळ्याचा पर्दाफार्श; चीनी नागरिकांची क्रिप्टो खाती गोठवली

न्युयॉर्कमधील मंदिरानंतर समाजकंटकांकडून कॅलिफोर्नियातील श्री स्वामीनारायण मंदिर लक्ष्य

न्यायालयाने पंधरा दिवसांची शिक्षा ठोठावली आहे. मला पंधरा दिवस काय, पंधरा वर्षे शिक्षा ठोठावली असती तरी मी सत्य बोलण्याचे थांबवणार नाही. आम्ही आता वरच्या न्यायालयात अपील करत आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, न्यायव्यवस्थेचे संघीकरण झाले आहे. ज्या देशाचे सरन्यायाधीश गणपतीचे मोदक खायला आपल्या घरी पंतप्रधानांना बोलवतात आणि पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी मोदक खायला जातात तिथे आम्हाला काय न्याय मिळणार?

Exit mobile version