राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय युद्ध रंगलेले असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेनड्राईव्ह बॉम्ब फोडले होते. यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. यावरूनच संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली.
महाराष्ट्रात इतक्या नीच पातळीचे राजकारण कधी झालेच नव्हते. घाणेरडी पद्धत म्हणत नाहीत याला सूड म्हणतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली. यांच्या घरात काय पेनड्राईव्ह बाळंत होतात का? रोज एक पेनड्राईव्ह बाळंत होतंय, अशी टीका संजय राऊत यांनी केली. आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह काढू आणि आमचा एक कव्हर ड्राईव्ह यांना भारी पडेल, असही संजय राऊत म्हणाले. माझ्या नागपूर दौऱ्यानंतर हे पेनड्राईव्ह बाहेर पडत आहेत. मात्र, तरीही मी विदर्भात जात राहणार, असे संजय राऊत म्हणाले.
भाजपावाल्यांना ठाकरे सरकार चालू द्यायचे नाही. अल कायद्याचा अजेंडा भाजपावाले राबवत आहेत, असे संजय राऊत म्हणाले. तुम्ही लोकांच्या घरात शिरू नका तुम्हाला ही घरं आहेत, असे संजय राऊत म्हणाले. दाऊदनेच यांना सुपारी दिली असावी, असेही संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा:
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची होणार सीबीआय चौकशी
‘कोल्हापुरात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला होता’
…आणि पंतप्रधान मोदींनी केली चित्रकार आयुषची इच्छा पूर्ण
माजी सरन्यायाधीश आर सी लाहोटी यांचे निधन
दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष नेत्यांनी सत्ताधारी नेत्यांना अनेक मुद्द्यांवरून चांगलेच घेरले होते. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणलेले पेनड्राईव्ह बॉम्बमुळे ठाकरे सरकारच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.