संजय राऊतांनी काँग्रेसला काढले चिमटे, हरियाणातील पराभवावर टीका

हरियाणामधील पराभवानंतर संजय राऊतांनी काँग्रेसला सुनावले

संजय राऊतांनी काँग्रेसला काढले चिमटे, हरियाणातील पराभवावर टीका

जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. या राज्यांचा निकाल हाती आला असून एका राज्यात भाजपाला यश मिळाले तर दुसऱ्या राज्यात इंडी आघाडीला यश मिळाले. हरियाणामध्ये काँग्रेसचं विजयी होऊन सत्ता स्थापन करेल असा दावा अनेक विरोधी नेत्यांनी केला होता. मात्र, हा दावा फोल ठरत तेथील जनतेने भाजपाला तिसऱ्यांदा कौल दिला. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हरियाणामध्ये पराभूत झालेल्या काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत.

संजय राऊत म्हणाले की, “हरियाणामधील पराभव दुर्दैवी आहे. काश्मीरमध्ये इंडी आघाडी जिंकली. हरियाणात इंडी आघाडी झाली असती तर, याचा फायदा झाला असता. सपा, आप, शिवसेना, एनसीपी यांना एक एक जागा मिळाली असती, तर याचा फायदा इंडी आघाडीला झाला असता. काँग्रेसला असं वाटलं आम्ही एकतर्फी जिंकू, आम्हाला कोणाची गरज नाही. जिथे काँग्रेस कमजोर असते तिथे काँग्रेस प्रादेशिक पक्षांची मदत घेते. हे भाजपाचे धोरण असते. जिथे काँग्रेसला वाटते आपण मजबूत आहोत तिथे ते स्थानिक पक्षांना फारसे महत्त्व देत नाही. या सर्व गोष्टींचा परिणाम हरियाणा सारख्या राज्यांच्या निकालावर होतो,” असं म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसच्या पराभवावर नाराजी व्यक्त केली.

“हरियाणाचा पराभव दुर्देवी आहे. यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. देशातील निवडणूक एकत्र लढवावी लागेल. कोणी स्वतःला छोटा भाऊ आणि मोठा भाऊ समजू नये. लोकसभेचं यश हे इंडी आघाडीचे यश आहे. हरियाणातील निवडणूक निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांची महाविकास आघाडी आहे. महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व जागरुक आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : 

लालू प्रसाद यांच्या नातेवाईकाकडून २५ कोटींची मालमत्ता जप्त!

जम्मू- काश्मीरच्या अनंतनागमधून दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण

घटना घडून पाच दिवस झाल्यानंतर बोपदेव घाट परिसर पाहणीचा देखावा कशासाठी?

आरबीआयकडून दिलासा; सलग दहाव्यांदा रेपो रेट जैसे थे स्थितीत

हरियाणामधील निकालानंतर काँग्रेसलाही भूमिका घ्यावी लागेल. अनेक राज्यांमधील निवडणुकांमध्ये भूमिका घ्यावी लागेल. काँग्रेसला देशभरात स्वबळावर लढायचे असल्यास त्यांनी तशी भूमिका घ्यायला हवी. त्यानंतर इतर पक्ष आपापला निर्णय काय तो घेतील, असा सल्ला संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे.

Exit mobile version