राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान महाविकास आघाडीमधील वादही सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत. अजित पवार आणि नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आजच्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून संजय राऊतांनी अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
ईडी सारख्या तपास यंत्रणामुळे निर्माण झालेली अस्वस्थता आणि त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपचा मार्ग हे एक कारण शरद पवारांच्या राजीनाम्यामागे असू शकतं. किंवा अजित पवार आणि त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी शरद पवारांनी हे पाऊल उचलले काय? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादीतील अनेकांचा एक पाय भाजपात आहे आणि पक्ष अशा तऱ्हेने फुटलेला बघण्यापेक्षा सन्मानाने निवृत्ती घ्यावी असा विचार पवारांच्या मनात आला असेल, असंही संजय राऊत म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे आणि राज्याच्या राजकारणात कधीही कोणता भूकंप होऊ शकतो असे वातावरण असताना पवारांनी राजीनामा देऊन धरणीकंप घडवल्याचे संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा:
बंगा होणार जागितक बँकेचे अध्यक्ष
राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती!
कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर मल्लिकार्जुन खर्गेंच्या मुलाला निवडणुक आयोगाची नोटीस
चेंबूर हादरले; संपत्तीच्या वादातून निवृत्त पोलीस उपायुक्ताच्या मुलाची हत्या
अजित पवारांच्या राजकारणाचे अंतिम ध्येय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे आहे. सुप्रिया सुळे दिल्लीत असतात. त्यांचा तेथील वावर चांगला आहे. राज्यातील अनेक नेते आज कुंपणावर आहेत आणि त्यातील अनेक नावे पवारांच्या पक्षातली आहेत. शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळ्यांना उघडे केले. मळभ आणि हवा स्वच्छ केली. आज जे पायाशी पडले तेच उद्या पाय खेचणार असतील तर त्यांचे मुखवटे ओरबाडून काढले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत असा हा विषय असला तरी . शरद पवार हे या घडामोडींचे नायक आहेत, असे म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.