संजय राऊत २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत

न्यायालयाने पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना २२ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संजय राऊत यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात केली जाणार आहे.

संजय राऊत २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत होते. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संजय राऊत यांना २२ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता संजय राऊत यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात केली जाणार आहे. तसेच संजय राऊत आता जामीनासाठी अर्ज करू शकणार आहेत.

गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ३१ जुलै रोजी त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानावरून ताब्यात घेतले होते. त्यानंतर रात्री उशिरा ईडीने संजय राऊत यांना अटक केली होती. त्यावेळी त्यांना चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती.

त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी त्यांची चार दिवसांची कोठडी संपली आणि संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सुनावणीत राऊतांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली होती. त्यानुसार आज संजय राऊत यांना पुन्हा न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा:

“पाकिस्तानी खेळाडू पदकं जिंकत आहेत हे नेत्यांना माहित आहे का?” पाक पत्रकाराचा सवाल

क्रिकेटमध्ये महिलांची ऐतिहासिक कामगिरी; रौप्यपदकावर कोरलं नाव

अमृता फडणवीस यांना ‘त्या’ गाण्यात का दिसला उद्धव ठाकरेंचा चेहरा

केजरीवाल यांचे ‘फुकट’चे उद्योग

पत्राचाळ गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार संजय राऊत आहेत. प्रवीण राऊत यांना फक्त पुढे केलं होत, असा आरोप ईडीने संजय राऊतांवर केला आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा १ हजार ३४ कोटी रुपयांचा आहे. मुंबईतल्या गोरेगावमधल्या पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे.

गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळीचे ३ हजार फ्लॅट्सचे बांधकाम करायचे होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट्स तिथल्या भाडेकरूंना तर, उर्वरित फ्लॅट्स म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. संजय राऊत यांचे निकटवर्ती प्रवीण राऊत यांची ही गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी असून या कंपनीला घरे विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला, असा आरोप आहे.

Exit mobile version