सामनातून मोदी सरकारवर सतत टीका करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांचे एक विधान सध्या गाजत आहे. “जागतिक स्तरावर पंतप्रधान मोदी आणि देशाची बदनामी सहन केली जाणार नाही.” हे राऊत यांचे विधान राजकीय विश्लेषकांना बुचकळ्यात टाकत आहे.
मंगळवारी माध्यमांशी संवाद साधत असताना पंतप्रधान आणि देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आता समन्वय असून, ते येत्या काळात योग्य तोच निर्णय घेतील, आमचा पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास आहे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता मद्रास उच्च न्यायालयानं अतिशय गंभीर टीप्पणी केली. ज्यामुळं देशातील विविध राज्यांमध्ये सुरु असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला निशाणा केलं गेलं. या टीप्पणीचा पंतप्रधान गांभीर्यानं विचारही करतील असंही ते म्हणाले.
मद्रास उच्च न्यायालयाप्रमाणेच कोरोनाच्या प्रसारासाठी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचं आम्हीही सांगत होतो असं म्हणत त्यांनी न्यायालयाच्या टीपण्णीला दुजोरा दिला. नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे की निवडणुका, असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा:
कोलकाता नाइट रायडर्सचे ‘इशारों इशारों में’
कोरोना झाला तर ‘या’ कंपनीत २१ दिवसांची पगारी सुट्टी
देवेंद्र फडणवीसांचे ज्युलिओ रिबेरोंना खुले पत्र
निवडणुकांमुळेच कोरोनाचा प्रसार झाला ही बाब सत्य आहे. कुंभमेळ्यावर आक्षेप घेतला गेला, त्याचप्रमाणं या निवडणुकांच्या निमित्तानं सुरु झालेल्या या राजकीय कुंभमेळ्यावरही आक्षेप असल्याचं म्हणत त्यांनी या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली