पद्म पुरस्कार देताना बुद्धदेव भट्टाचार्य यांना विचारले नसावे!

पद्म पुरस्कार देताना बुद्धदेव भट्टाचार्य यांना विचारले नसावे!

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आल्यानंतर त्यात तीन पुरस्कार विजेत्यांनी हे पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. त्यावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ज्यांनी पुरस्कार नाकारला त्यातील बुद्धदेव भट्टाचार्य यांना पुरस्कार देण्याआधी विचारले होते का? संजय राऊत यांचा हा सवाल आश्चर्यजनक होता.

पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षाचे नेते बुद्धदेव भट्टाचार्य, गायिका संगीता मुखोपाध्याय आणि अनिंद्या चटर्जी यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते, पण त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २५ जानेवारीला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. त्यावरून संजय राऊत यांना राग अनावर झाला. मरणोत्तर पुरस्कार कशाला दिले जातात? ज्यांच्यावर आधी टीका करायची आणि नंतर त्यांना पुरस्कार द्यायचे असे का केले जाते? असा प्रश्न विचारतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पद्मविभूषण पुरस्कार का दिला नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.

पद्म पुरस्कार पश्चिम बंगालमधील लोकांना देण्यात आले. संध्या मुखोपाध्याय, बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पुरस्कार घ्यायला नकार दिला आहे. बुद्धदेव यांनी बंगालचे नेतृत्व केले आहे. त्यांना विचारले गेले नसावे पुरस्काराबद्दल. अलिकडे पद्म पुरस्काराबद्दल एक प्रथा पडली आहे की, ते उठसूठ कुणालाही दिले जातात. मग हे पुरस्कार नाकारले जातात. जिवंतपणी किंमत करत नाही. मरणोत्तर पुरस्कार  देण्याची प्रथा-पायंडे थांबले पाहिजेत.

हे ही वाचा:

राजपथावर संचलन पाहायला होते ‘हे’ खास पाहुणे

राजपथावर घडले भारतीय संस्कृती आणि सामर्थ्याचे दर्शन

उत्तर भारतीय संघाच्या अध्यक्षपदी संतोष आर एन सिंह

भारतीय महिला हॉकी संघाला उघडले वर्ल्डकपचे दरवाजे

 

राऊत म्हणाले की, वीर सावरकरांना यावेळी भारतरत्न देतील असे वाटले होते. पण सावरकर उपेक्षितच आहेत. इतक्या लोकांना पद्म देता तुमच्या सरकारला असे का वाटले नाही की, बाळासाहेब ठाकरेंनाही पद्मविभूषण पुरस्कार द्यावा. राहुल गांधी यांनी बाळासाहेबांबद्दल ट्विट केले नाही, याची चिंता फडणवीसांना आहे त्यापेक्षा बाळासाहेबांना पद्म किंवा भारतरत्न का द्यावासा वाटला नाही. फडणवीसांनी याचे उत्तर दिले तर आम्हाला राहुल गांधी, प्रियांका गांधी बाळासाहेबांबद्दल ट्विट का करत नाहीत याविषयी बोलता येईल.

 

Exit mobile version