संजय राऊतांना फुटल्या रावण प्रेमाच्या उकळ्या

संजय राऊतांना फुटल्या रावण प्रेमाच्या उकळ्या

शिवसेना खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असतात. अशाच एका ताज्या विधानात त्यांना रावण प्रेमाच्या उकळ्या फुटतना दिसत आहेत. “रावणाने सीतेला पळवून नेले पण कधीही तिच्यावर अत्याचार केला नाही” असे धक्कादायक विधान राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.

महाराष्ट्रात महिला अत्याचाराचे सत्र काही थांबताना दिसत नाहीये. दररोज राज्याच्या विविध भागातून महिला अत्याचाराच्या घटना समोर येताना दिसत आहेत. नुकत्याच डोंबिवली येथून समोर आलेल्या घटनेने राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा:

आसाम सरकारने मुक्त केली मंदिरांची जमीन

जेंव्हा कमला हॅरिस पाकिस्तानी दहशतवादावर बोलतात…

काँग्रेसमध्ये रागाला जागा नाही, पण अपमानाला आहे?

‘ऑकस’नंतर बायडन-मॅक्रॉन “मैत्रीपूर्ण” फोन

पण याविषयी प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजब तर्क मांडला. शुक्रवार, २४ सप्टेंबर रोजी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी मांडलेले मत फारच धक्कादायक होते. “महिलांवर अत्याचार व्हावा असे कोणत्याच सरकारला वाटत नसते. रावणालाही वाटत नसेल. म्हणूनच रावणाने जेव्हा सीतेला पळवून नेले तेव्हा तिच्यावर अत्याचार केले नाहीत. तिला सन्मानपूर्वक अशोक वनात ठेवले” अशी मुक्ताफळे राऊत यांनी उधळली.

पण माध्यमांसमोर आपले हे ‘मौलिक’ विचार प्रकट करताना राऊत यांना एका गोष्टीचा मात्र विसर पडलेला दिसला. तो म्हणजे रावणाने विवाहित, पतिव्रता असलेल्या सीतेला पळवून नेले होते आणि हाच एक मोठा अत्याचार होता. राऊतांच्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली दिसत आहे. तर आता या विधानावरून नवे काही राजकीय हल्ले-प्रतिहल्ले पाहायला मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Exit mobile version