संजय राऊत यांना लस ‘टोचली’; चिदंबरम यांना भाषण झोंबले

संजय राऊत यांना लस ‘टोचली’; चिदंबरम यांना भाषण झोंबले

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी त्यांची भेट झाली आहे आणि विविध विषयांवर चर्चाही झाली आहे, पण त्यामुळे भारतातील मोदीविरोधकांना पोटशूळ उठला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’मधील रोखठोकमध्ये पंतप्रधानांना कोव्हॅक्सिनच्या दोन लशी घेऊनही अमेरिकेत कसा प्रवेश दिला याची चिंता व्यक्त केली आहे. सर्वसामान्यांना कोव्हॅक्सिनच्या दोन लशी घेऊनही परदेशात परवानगी नाही, मग मोदी तिथे कसे जातात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सर्वसामान्यांना एक नियम आणि मोठ्यांना दुसरा असे कसे चालेल असे विचारताना संजय राऊत हे मोदी पंतप्रधान असल्याचे विसरले आहेत. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांसाठी लसीकरणाबाबत वेगळे नियम आहेत, याचा विसर संजय राऊत यांना पडला आहे.

शिवाय, यात असाही दावा करण्यात आला आहे की, कोव्हिशिल्डच्या लसीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे. पण ज्यांना लसीचे दोन डोस घेतले त्यांनाच आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार असल्यामुळे अनेक विद्यार्थी, उद्योजकांचे वांदे झाले आहेत. मुंबईतही लोकल रेल्वेने दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी असल्यामुळे एक डोस घेतलेल्या सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याचे मात्र राऊत विसरून गेलेले आहेत.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील जंगल सफारी पुन्हा सुरु होणार

राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत बोरिवलीचे १० खेळाडू

अबब! अडीच लाख वर्षांपूर्वीही पुण्यात माणसाचे होते अस्तित्व

पालिकेला दिसले मुंबईत फक्त ९२७ खड्डे

दुसरीकडे काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना तर संयुक्त राष्ट्रांत झालेले मोदींचे भाषण फारच झोंबले आहे. तिथे किती टाळ्या वाजल्या आणि किती लोक उपस्थित होते, यावर ट्विट करून आपला जळफळाट व्यक्त केला आहे.

संयुक्त राष्ट्र संघातील भाषण हे सर्वसामान्य लोकांसमोर केलेले भाषण नसते, हे चिदंबरम विसरल्याचे त्यांच्या ट्विटवरून दिसून येते आहे.

Exit mobile version