…तर एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करायचे होते!

…तर एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करायचे होते!

संजय राऊत यांनी अडीच वर्षांनी केला गौप्यस्फोट

सत्तेतला वाटा मिळावा महत्त्वाकांक्षा, लालसा आमिष ही सूत्रे या बंडामागे आहेत, असे विधान करतानाच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. हिंदुत्व वगैरे फक्त फोडणी आहे. पण त्यांना मुख्यमंत्री बनण्यापासून रोखले आहे भाजपाने. मी संगतो तुम्हाला भाजपाने कमिटमेंट पाळली असती अडीच वर्षे किंवा ५०-५० टक्के भागीदारी तसेच अमित शहा व भाजपाने शब्द पाळला असता तर उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री हवे होते मनात. उद्धव ठाकरे एका ठराविक परिस्थितीत मुख्यमंत्री झाले. त्यावेळी कुणीतरी असा नेता आवश्यक होता जो उद्धव यांच्याव्यतिरिक्त अन्य कुणी दिसला नाही. आम्ही आग्रह केला. शेवटी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी तब्बल अडीच वर्षांनी गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह ४० पेक्षा अधिक आमदारांनी बंड केल्यानंतर संजय राऊत यांनी हा आताच गौप्यस्फोट का केला, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत म्हणाले की, भाजपाशी करार झाला असता तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते. मग एकनाथ शिंदे हेच झाले असते हे एकनाथ शिंदे यांना माहीत आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले नाही म्हणून युती तुटली. पण जर हे झाले असते तर एकनाथ शिंदे हेच मनात होते, असेही राऊत म्हणतात.

एकनाथ शिंदे जुने सहकारी जवळचे मित्र आहेत. एकमेकांशी नाते आहे. ८ दिवसांपूर्वी अयोध्येत होतो. असे सांगताना संजय राऊत म्हणतात की, सदा सरवणकर,  गुलाबराव पाटील, दादा भुसे हे सगळे मंत्री अचानक निघून गेले. गुलाबराव पाटील जुना माणूस. पानटपरीवाल्याला कसे कॅबिनेट मंत्री केले, पण ते पळून जातात याला काय म्हणायचे. २४ तासात त्यांची मंत्रिपदे जातील. कारवाई सुरू आहे. प्रत्येक गोष्ट कायद्याने होते. कायद्याचं राज्य आहे.

हे ही वाचा:

आनंद दिघेंच्या चेल्याला कोण घाबरवतंय?

तिस्ता सेटलवाडला गुजरात एटीएसने केले अटक

शिंदेंचे समर्थन करण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर

अखेर औरंगाबादच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे निलंबित

 

काय बोलणं झालं संजय राऊत, उद्धव, रश्मी यांच्याशी या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, मी बोललो त्यांना की तुम्ही संदेश दिला तो कळला. आपण बोलू यावर. तुम्ही या उद्धवसाहेब ऐकायला तयार आहेत. मविआतून बाहेर पडायचे तर त्याचा विचार करू. चर्चा केली पाहिजे मुंबईत राहूनही करता आल्या असत्या. पण खोटे बोलून ते सूरतला घेऊन गेले. काही आमदारांनी गाडी थांबवून पळून आले. अनेक आमदार आहेत ते आमच्याशी बोलत आहेत.

Exit mobile version