बुधवारी महाराष्ट्राच्या गृह विभागात मोठे बदल करण्यात आले. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची हकालपट्टी करत त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी ही ‘रुटीन प्रोसेस’ असल्याचे म्हटले आहे. दिल्ली येथे राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सरकारी नोकरीत बदल्या या होत असतात. महाराष्ट्र सरकारला असे वाटले असेल की गृह खात्यात काही बदल करणे गरजेचे आहे. यावरून कोणाच्या मानत काही शंका यायचे कारण नाही. मुंबई मोठे शहर आहे आणि परमबीर सिंह हे मोठे अधिकारी आहेत. अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
कोण आहेत मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे?
अखेर परमबीर सिंह यांची हकालपट्टी
परमबीर सिंह यांचे तात्काळ निलंबन करून त्यांना अटक करा – अतुल भातखळकर
सचिन वाझे प्रकरणावर विचारले असता हे काही प्रकरण नाहीच आहे असे राऊत म्हणाले. विरोधी पक्षाला जरका हे प्रकरण वाटत असेल आणि हे वाढवावे असे वाटत असेल तर त्यांच्याकडे साडे तीन वर्ष आहेत. त्यांनी अशी प्रकरणे शोधावीत आणि वाढवावीत. ठाकरे सरकार मजबूत आहे. ठाकरे सरकारच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही असे राऊतांनी सांगितले.
वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्त म्हणून पदभार सोपवण्यात आला आहे. नगराळे यांच्या जागी रजनीश सेठ हे राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळतील. परमबीर सिंह यांच्याकडे आता गृहरक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
गृह खात्यातील या बदल्यांनंतर संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. “मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एकाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये.” असे राऊतांनी लिहिले आहे.
मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एकाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा. @AnilDeshmukhNCP @OfficeofUT
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 17, 2021