…तर वायनरी त्यांच्या नावावर करायला तयार!

…तर वायनरी त्यांच्या नावावर करायला तयार!

महाराष्ट्रात किराणा दुकानात आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर राजकीय वर्तुळात हा वाईनचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यावरूनच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली होती. तसेच वाईनचा व्यवसाय करणाऱ्या एका बड्या उद्योगासोबत संजय राऊत यांची पार्टनरशीप आहे, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एखाद्या कुटुंबाती व्यक्ती एखादा व्यवसाय करत असेल तर तो गुन्हा आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. राऊत कुटुंबियांचे वाईन उद्योजकांसोबत करार झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला. तसेच त्यासंबंधी काही कागदपत्रेही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवली. किरीट सोमय्यांनी जे नाव सांगितलं ते वाईनरी कंपनीत संचालक आहेत. संचालक असणे हा गुन्हा आहे का? भाजपच्या नेत्यांची मुले केळी विकतात का? किरीट सोमय्यांचा मुलगा चणे शेंगदाणे विकतो का?असे काही सवाल संजय राऊत यांनी विचारले.

हे ही वाचा:

मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाने गमावला पाय

‘संजय राऊत यांची वाइन उद्योगात मोठी गुंतवणूक’

भारतातील ७५% प्रौढ नागरिक लसवंत

नथुरामवरील चित्रपटाचे भवितव्य

भाजच्या लोकांनी जे आरोप केलेत, ते जर खरे असतील तर त्या त्यांच्या नावावर करायला तयार आहोत असे संजय राऊत म्हणाले. वाईन विक्रीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांच्या कुटुंबाने वाईन उद्योगातील मोठ्या व्यक्तीशी पार्टनरशिप सुरु केली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. त्यांचा उद्योग फक्त पैसे गोळा करणे हाच आहे. महाराष्ट्राला तुम्ही मद्यराष्ट्र केलं आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Exit mobile version