सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संजय राऊत थरथरत बोलले, सरकारने राजीनामा द्यावा!

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पत्रकारांशी साधला संवाद

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संजय राऊत थरथरत बोलले, सरकारने राजीनामा द्यावा!

हे सरकार बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आल्यानंतर राऊत यांनी निर्णयाचे स्वागत केले पण संतापून त्यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी सगळ्या गोष्टी बेकायदेशीर असल्याचे म्हणत सांगितले की, शिंदे गटाने बजावलेला व्हीप बेकायदेशीर असून ती प्रक्रिया बेकायदेशीर होती. कोणत्याही गटाला शिवसेनेवर दावा करता येणार नाही, हा महत्त्वाचा निर्णय.

राज्यपालांनी घेतलेली भूमिका बेकायदेशीर, विश्वासदर्शक ठरावाचा निर्णय राजकीय हेतूने घेतला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना पुन्हा आणू शकलो असतो, असे जेव्हा मुख्य न्यायाधीश म्हणतात,  याचा अर्थ ते सरकारही बेकायदेशीर पद्धतीने खाली खेचण्यात आले. विधानसभा अध्यक्षांकडे येणार असेल तर येऊ द्या व्हीपच बेकादेशीर आहे प्रक्रियाच बेकायदेशीर आहे. या प्रक्रियावर त्यांनी घटनेनुसार निर्णय घ्यावा अध्यक्षांनी. आपण कायद्याच्या संविधानाच्या बाजूने आहोत हे ठरवावे. ते कायदेपंडित आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

सचखंड श्री हरमंदिर साहिबजवळ स्फोट घडवणाऱ्या पाच जणांना अटक

अदानींवरील हिंडेनबर्गच्या आरोपांच्या ठिकऱ्या; मॉरिशसच्या मंत्र्यांचे स्पष्टीकरण

जयंत पाटलांना ईडीची नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

अदानींवरील हिंडेनबर्गच्या आरोपांच्या ठिकऱ्या; मॉरिशसच्या मंत्र्यांचे स्पष्टीकरण

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल देशाला लोकशाहीला दिशा देणारा आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी लोकशाही जिवंत असल्याचे सांगितले तसेच संविधानावरचा विश्वास अजूनही कायम आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभारी आहोत, असेही सांगितले. काही गोष्टी इकडेतिकडे आहेत. शिंदे गटाचे व्हीप बेकायदेशीर. सुनील प्रभू हेच व्हीप.

सरकार जाणार म्हणून उड्या मारणाऱ्यांना उत्तर

यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आला त्या निकालामुळे समाधानी. आम्ही यासंदर्भात पत्रकार परिषदेत भूमिका मांडू. पण याबाबत ज्या चर्चा केल्या गेल्या त्या किती थोतांड होत्या, हे स्पष्ट झाले. शिवाय, जे उड्या मारत होते की, सरकार जाणार त्यांना उत्तर मिळाले आहे. त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे.

Exit mobile version