तोंडी आरोपांची राळ उडवणाऱ्या राऊत यांच्याकडून नवे आरोप

तोंडी आरोपांची राळ उडवणाऱ्या राऊत यांच्याकडून नवे आरोप

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यात सध्या आरोपप्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. विक्रांत प्रकरणी ५८ कोटींचा अपहार केल्याचा तोंडी आरोप करणाऱ्या संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आता नवा आरोप केला आहे. किरीट सोमय्यांसोबतच राऊत यांनी तपास यंत्रणांवर देखील आरोप केले आहेत.

“ईडी, सीबीआयचा वापर करून काही लोक धमक्या देतात आणि पैसे उकळून हे बँक ऑफ थायलंडमध्ये जमा करतात. हे प्रकरण लवकरच उघडकीस आणणार आहे, असे संजय राऊत म्हणाले. किरीट सोमय्यांनी पैसे गोळा करून त्यांचे काय केले? हा पोलिस तपासाचा भाग आहे. राजकीय सुडाच्या भावनेने आम्ही आरोप करत नाही. मनात भीती नसेल तर पोलिसांसमोर हजर व्हायला पाहिजे. अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करताय. कायद्यापासून पळू नका असे स्वतः म्हणता आणि तुम्हीच पळ काढता, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

हे ही वाचा:

नीरव मोदीचा सहकारी सुभाष शंकरला इजिप्तमध्ये पकडले

पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी सुनावले खडे बोल

पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना!

गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीत २ दिवसांची वाढ

काही लोकांची माफिया टोळी लोकांना ईडी, तपास यंत्रणांच्या धमक्या देतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात. ते पैसे बँक ऑफ थायलंडमध्ये जमा केले जातात. हे प्रकरण लवकरच समोर आणणार आहे. विदेशात पैसे कोण पाठवते? हा लवकरच खुलासा करणार आहे. तसेच यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बोलणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Exit mobile version