राज्यात सध्या भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. कोर्लाई गावात ठाकरे कुटुंबियांचे १९ बंगले नाहीत असा दावा संजय राऊतांनी केला होता. मात्र, या बंगल्यांचा कर रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर भरत आहेत, अशी कागदपत्रे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत मांडली होती. याच बंगल्यांचे सत्य समोर आणण्यासाठी किरीट सोमय्या हे आज कोर्लाई येथे रवाना झाले आहेत. त्यावरून संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.
पूर्वीच स्पष्ट केलं होत की, ते जेलमध्ये जातील, जेलमध्ये जाण्यासाठी ते मार्ग शोधत आहेत, असे संजय राऊत म्हणाले. लवकरच जनता त्यांच्या मागे लागेल. जनता मागे आणि ते पुढे अशी वेळ येईल, असेही ते म्हणाले. कोर्लाई गावच्या सरपंचांनी माहिती दिली आहे. त्यामुळे हा भुताटकीचा प्रकार दिसतोय, असे संजय राऊत म्हणाले.
संबंधित जागेचे मूळ मालक हे अन्वय नाईक होते. अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली यावर भाजपचे लोक बोलत नाहीत. ज्याच्यामुळे अन्वय नाईक यांना आत्महत्या करावी लागली त्याच्या समर्थनार्थ भाजपचे लोक बोलत होते, असे संजय राऊत म्हणाले. तसेच किरीट सोमय्यांनी दोन वेळा अन्वय नाईक यांना धमकी दिल्याची माझ्याकडे माहिती त्यांच्याकडे असल्याचे ते म्हणाले. धमकीनंतर अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली. महाराष्ट्र आणि मुंबईतून मराठी उद्योजकांना संपवायचे आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
हे ही वाचा:
भारतीय संघ जिंकणार टी-२० मालिका?
सुधीर जोशींवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शपथपत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल अब्दुल सत्तार यांची चौकशी
किरीट सोमैय्या कोर्लाई गावाकडे रवाना
दरम्यान किरीट सोमय्या हे आज सकाळी कोर्लाई गावात जाण्यासाठी निघाले आहेत. जनतेला वास्तव समजून घ्यायचं आहे. जनतेला त्या ठिकाणी घर आहे की नाही हे समजून घ्यायचं आहे. महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेला किरीट सोमय्याकडून अपेक्षा आहे, असे किरीट सोमय्या त्यांच्या कोर्लाई दौऱ्याबद्दल म्हणाले.