शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड (एनएसईएल) संदर्भातील ५६०० कोटींच्या घोटाळ्यामध्ये किरीट सोमय्यांनी लाखो रुपये आपल्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत हे आरोप केले आहेत.
“एनसएसईएलच्या ५ हजार ६०० कोटी रुपयांच्या शेअर्स घोटाळ्याच्या चौकशीची मागणी किरीट सोमय्यांनी केली होती. मोतीलाल ओसवाल कंपनीची या प्रकरणी ईडीने चौकशी केली. स्वतः किरीट चौकशीसाठी कंपनी शिपायांचे घरी गेले. तमाशा केला. २०१८- १९ असे दोन वर्ष सोमय्यांनी मोतीलाल ओसवालकडून लाखो रुपये त्यांच्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतले,” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून संशयास्पद देणग्या घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. “पश्चिम बंगालमध्ये मेट्रो डेअरी म्हणून आहे. त्यात गैरव्यवहार झालेले असून ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडल्या आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपये देण्यात असून खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. अशा कंपन्या किरीट सोमय्या यांच्या प्रतिष्ठानला देणग्या कशा देतात? अशा एकूण १७२ कंपन्या आहेत,” असे राऊत यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
महसूल गुप्तचर संचालनालयाने हाणून पाडले सोन्याच्या तस्करीचे प्रयत्न
‘ ठाकरे सरकारविरोधात राज यांनीही लढावे’
महसूल गुप्तचर संचालनालयाने हाणून पाडले सोन्याच्या तस्करीचे प्रयत्न
‘आडनावांवरून पालिका कारवाई करते आहे का’?
“किरीट सोमय्या हे भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत. मात्र, त्यांचे जे युवक प्रतिष्ठान आहे, त्या युवक प्रतिष्ठानच्या खात्यामध्ये संशयास्पद देणग्या कशा येतात? देणगीच्या नावाखाली खंडणी गोळा केली जाते. ज्या कंपन्यांवर ईडी, सीबीआय चौकशी आहे. कंपन्यांवर धाडी पडणार आहेत किंवा पडत आहेत, अशा कंपन्यांकडून हे महाशय देणगी उचलत आहेत. ईडी आणि सीबीआयच्या कामाची पद्धत अशी आहे की, एखाद्या मोठ्या कंपनीवर गैरव्यवहारासंबंधी धाड पडली. तर ज्या ज्या लोकांना या कंपनीच्या माध्यमातून आर्थिक लाभ झाला आहे. त्यांची सुद्धा चौकशी होते किंवा त्यांना सुद्धा अटक केली जाते. नवाब मलिक यांचं प्रकरण असेच असून आमचीही अशीच चौकशी झालेली आहे,” असे संजय राऊत म्हणाले. तसेच भाजपाच्या आणखी २८ नेत्यांचे घोटाळे बाहेर आणणार, असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.