मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव; संजय राऊतांचा नवा आरोप

मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव; संजय राऊतांचा नवा आरोप

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर राज्यात भाजपा विरुद्ध शिवसेना यांच्यात आरोपप्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आज पुन्हा काही आरोप केले आहेत. INS विक्रांतच्या नावाने केलेल्या भ्रष्टाचारचा किरीट सोमय्या यांनी हिशोब द्यावा अशी मागणी त्यांनी आजही केली तर मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे संजय राऊत म्हणाले.

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचे षडयंत्र सुरू आहे. बैठका सुरू आहेत. दिल्लीत प्रेझेंटेशन सुरू आहेत. तसेच ही माहिती मी जबाबदारीनेच देतोय आणि दोन महिन्यांपासून लक्ष आहे, असेही संजय राऊत म्हणाले. हे संपूर्ण प्रकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही माहिती आहे. मराठी माणसाचं मुंबईवर नियंत्रण राहू नये यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

UNHRC मधून रशिया निलंबित

इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर मतदान होणार

यशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

ईडीची कारवाई झालेल्या संजय राऊतांचं शिवसैनिकांकडून जंगी स्वागत

मुंबईला वेगळ करण्याच्या षडयंत्रात किरीट सोमय्या हे सूत्रधार आहेत. तर एक जण वाराणसीचा आहे आणि एक मोठा बिल्डर आहे, अशी माहिती संजय राऊत म्हणाले. INS विक्रांतच्या संदर्भात किरीट सोमय्या यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण हे कसाब आणि अफझल गुरू इतकंच मोठं प्रकरण आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Exit mobile version