‘शिवसेनेने छत्रपती घराण्याचा कायम सन्मानच केला!’ संजय राऊतांचे गिरे तो भी टांग उपर

‘शिवसेनेने छत्रपती घराण्याचा कायम सन्मानच केला!’ संजय राऊतांचे गिरे तो भी टांग उपर

शिवसेना नेते सामनाचे संपादक संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा नवी पुडी सोडली आहे. शिवसेनेने छत्रपती घराण्याचा कायम सन्मानच केल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभा उमेदवारीवरून शिवसेनेवर केलेल्या फसवणुकीच्या आरोपांनंतर संजय राऊत यांचे हे विधान म्हणजे गिरे तो भी टांग उपर असल्याचे म्हटले जात आहे

रविवार, २९ मे रोजी कोल्हापूर येथे संजय राऊत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. या आधी सकाळी त्यांनी कोल्हापूरच्या शाहू छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांच्यासोबत शिवसेनेचे दुसरे राज्यसभा उमेदवार संजय पवार हे देखील होते कोल्हापूरमध्ये बोलताना ‘शिवसेना कधीच कोणाची फसवणूक करत नाही. आम्हाला ज्यांनी फसवले तेच आमच्यावर फसवणुकीचा आरोप करतायंत असे म्हटले. तर शिवसेनेने कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसले नाही. आम्ही छत्रपतींच्या घराण्याचा कायम सन्मानच केला आहे असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींनी सांगितली ही योग दिनाची थीम

योगी सरकारचा महिलांसाठी निर्णय, सातच्या आत घरात!

‘ह्या’ राज्यात आहे देशातील सर्वात जास्त सोन्याचा साठा

पंतप्रधान मोदी साधणार अनाथ मुलांशी संवाद

तर औरंगजेबाच्या कबरीवरूनही त्यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाची कबर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे असे संजय राऊत म्हणाले. पण असे असले तरी देखील राज्य सरकारचे पोलीस त्या कबरीला संरक्षण देत असल्याचे संजय राऊत पद्धतशीरपणे विसरले. तर पुन्हा एकदा औरंगजेब हा गुजरातमध्ये जन्माला आला होता असे सांगत त्यांनी मराठी आणि गुजराती हा वाद निर्माण करायचा प्रयत्न केला.

Exit mobile version