दिलासा नाहीच, संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी वाढली

न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ

दिलासा नाहीच, संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी वाढली

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. राऊत यांनी न्यायालयाकडे जामीन अर्ज केला आहे. बुधवारी त्यांच्या जामीन अर्जावर पुन्हा एकदा सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ केली आहे.

संजय राऊत यांना ईडीने जूनमध्ये अटक केली होती. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आला. दरम्यान, २ नोव्हेंबरला राऊतला पुन्हा पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने लेखी उत्तर दिले. या सुनावणीदरम्यान राऊत यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे राऊत याना जामिन की तुरुंग यावर ९ नोव्हेंबरला निर्णय होणार आहे.

गोरेगाव पत्राचाळ प्रकरणातील संजय राऊत यांच्या पत्नीचीही ईडीने चौकशी केली आहे. राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांनाही अटक करण्यात आली आहे. राऊतने प्रवीणच्या मदतीने ही फसवणूक केली. यानंतर ईडीकडून मनी लाँड्रिंगच्या रकमेची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या व्यवहारात प्रवीण राऊत यांना मिळालेली रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. राऊत यांनी त्यांच्याकडून अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोपही ईडीने केला आहे. संजय राऊत यांना ईडीने ३१ जुलै रोजी ताब्यात घेतले होते. नंतर त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत फेटाळले आणि राजकीय कारणास्तव आपल्यावर खोटे आरोप केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हे ही वाचा:

भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी

मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश

भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पण पाकिस्तानची गोची

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने भूखंड पत्रव्यवहार करूनही नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पत्राचाळीतील ६७२ कुटुंबांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी गुरु-आशिष कन्स्ट्रक्शनची नियुक्ती केली होती. मात्र या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर येथे राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Exit mobile version